इंग्लंडमधील लंडनउच्च न्यायालयाने पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) कर्ज घोटाळ्यातील आरोपी आणि हिरे व्यापारी नीरव मोदी वापरत असलेला आणि ट्रस्टच्या मालकीचा फ्लॅट विकण्यास परवानगी दिली आहे. हा आलिशान फ्लॅट लंडनमध्ये असून न्यायालयाने बुधवारी त्याच्या विक्रीस परवानगी दिली. मात्र, या फ्लॅटची विक्री 52.5 लाख ब्रिटिश पाउंड पेक्षा कमी किंमतीत विकता येणार नाही.
न्यायमूर्ती मास्टर जेम्स ब्राइटवेल यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी पार पडली. यात दक्षिण-पूर्व लंडनच्या थेमसाइड कारागृहात असलेला 52 वर्षीय पळपुटा नीरव मोदीनेही ऑनलाइन माध्यमाने सहभागी झाला होता. यावेळी न्यायालयाने ट्रस्टची सर्व देणी चुकविल्यानंतर, 103 मॅरेथन हाऊसच्या विक्रीतून मिळणारे रक्कम एका सुरक्षित खात्यात ठेवण्याची अंमलबजावणी संचालनालयाची विनती मान्य केली आहे.
ट्राइडेंट ट्रस्ट कंपनी (सिंगापूर) पीटीई लिमिटेडने मध्य लंदनच्या मॅरीलेबोन भागातील अपार्टमेंट संपत्तीच्या विक्रीची परवानगी देण्याची मागणी केली होती. तर ईडीने, ट्रस्टची ही संपत्ती पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातून मिळालेल्या पैशांतून खरेदी करण्यात आली आहे आणि या प्रकरणात नीरव प्रत्यार्पणाच्या कारवाईला सामोरा जात आहे.
मास्टर ब्राइटवेल यांनी निर्णय दिला आहे की, ‘मी समाधानी आहे. मालमत्ता 52.5 लाख पाउंड अथवा त्याहून अधिक किंमतीत विकण्याची परवानगी देणे हा योग्य निर्णय आहे.' यावेळी त्यांनी, ट्रस्ट स्थापनेशी संबंधित ईडीच्या इतर आक्षेपांचीही दखल घेतली. ज्यावर प्रकरणाच्या या टप्प्यावर कारवाई करण्यात आली नाही. यावेळी ईडीकडून बॅरिस्टर हरीश साळवे उपस्थित होते.