Join us

Income Tax: आयकर विभागाची नवी वेबसाईट 'क्रॅश'; सीतारामननी इन्फोसिस, निलेकनींचा ट्विटरवर क्लास घेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 3:52 PM

Income Tax new website glitches: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी थेट इन्फोसिस आणि नंदन निलेकनींना टॅग करत चांगलेच सुनावले आहे.

Income Tax new website: मोठा गाजावाजा करून आणि सहा दिवस सर्व्हर बंद ठेवून आयकर विभागाची नवीन वेबसाईट सोमवारी रात्री लाँच करण्यात आली. मात्र, करदात्यांनी ही वेबसाईट क्रॅश होत असल्याचे फोटो ट्विटरवर टाकल्याने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटरवरच इन्फोसिस (Infosys) आणि कंपनीचे सह संस्थापक अध्यक्ष नंदन निलेकनींना (Nandan Nilekani) चांगलेच सुनावले आहे. (Finance Minister Nirmala Sitharaman has asked Infosys to fix glitches in the new income tax e-filing website that was launched on Monday. )

Income Tax: करदात्यांनो! यापुढे बँक, एलआयसी स्टेटमेंट आयकर विभागाला देण्याची गरज नाही; जाणून घ्या...ई-फायलिंग पोर्टल 2.0 सोमवारी रात्री 8.45 मिनिटांनी लाँच करण्यात आले. या नव्या वेबसाईटवर आयकर विभागाने वेगवेगळ्या सुविधा दिल्या आहेत. यामध्ये तुमचा पॅन नंबर टाकल्यानंतर तुमच्या अकाऊंटला तुमची सारी माहिती आपोआपच लोड होणार आहे. अशा अनेक सुविधा या वेबसाईटवर देण्यात आल्या आहेत. मात्र, ही वेबसाईटच सुरु होण्यास समस्या येऊ लागल्याने अनेकांनी याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत तक्रार केली होती. 

यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी थेट इन्फोसिस आणि नंदन निलेकनींना टॅग करत चांगलेच सुनावले आहे. त्यांनी अशाप्रकारची असुविधा पुन्हा करदात्यांना होता नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. करदात्यांना चांगली सेवा देणे आपली प्राथमिकता असायला हवी, असे त्या म्हणाल्या. 

टॅग्स :इन्कम टॅक्सनिर्मला सीतारामननिर्मला सीतारामनइन्फोसिसनंदन निलेकणी