Lokmat Money > बिझनेस न्यूज > सुटे धान्य, दही, लस्सीसह अन्य खाद्यपदार्थांवर जीएसटी नाहीच! निर्मला सीतारामन यांचे स्पष्टीकरण

सुटे धान्य, दही, लस्सीसह अन्य खाद्यपदार्थांवर जीएसटी नाहीच! निर्मला सीतारामन यांचे स्पष्टीकरण

कोणत्या सुट्या वस्तूंवर जीएसटी लागणार नाही, याची यादीही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 05:28 AM2022-07-20T05:28:06+5:302022-07-20T05:28:44+5:30

कोणत्या सुट्या वस्तूंवर जीएसटी लागणार नाही, याची यादीही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

nirmala sitharaman clear that there is no gst on other food items including spare grains curd lassi | सुटे धान्य, दही, लस्सीसह अन्य खाद्यपदार्थांवर जीएसटी नाहीच! निर्मला सीतारामन यांचे स्पष्टीकरण

सुटे धान्य, दही, लस्सीसह अन्य खाद्यपदार्थांवर जीएसटी नाहीच! निर्मला सीतारामन यांचे स्पष्टीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : सुटे धान्य, दही, लस्सी अशा काही वस्तूंवर  जीएसटी लावलेला नसून या वस्तू पॅकेजिंग करून विकल्यास किंवा त्या स्वरूपात असल्यासच पाच टक्के कर लागणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्वीटरवरून स्पष्ट केले. सोबत कोणत्या सुट्या वस्तूंवर जीएसटी लागणार नाही, याची यादीही त्यांनी दिली. या वस्तू पॅकेजिंग केलेल्या नसल्यास त्यांना कर लागणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

गेल्या महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. २५ किलो वजनाच्या प्री-पॅकेज केलेल्या आणि लेबल केलेल्या खाद्यपदार्थांवर ५ टक्के जीएसटी लावण्यात आला होता. याची अंमलबजावणी १८ जुलैपासून झाली होती. यामध्ये अनेक वस्तूंचा जीएसटीदेखील वाढविण्यात आला. यामुळे अनेक पॅकेजबंद वस्तू, खाद्यपदार्थ महाग झाले.

यावर शून्य कर!

सुट्या डाळी, गहू, राई, ओट्स, मका, तांदूळ, पीठ, रवा, बेसन, मुढी, दही आणि लस्सी

काँग्रेसची सरकारवर टीका

खाद्यपदार्थ महाग झाले. गॅस सिलिंडर हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. मोदी विरोधी पक्षात होते तेव्हा त्यांनी महागाईचा मुद्दा उचलून धरला होता. त्यावरून हल्लाबोल केला होता. आता ते याच महागाईच्या दलदलीत जनतेला ढकलत आहेत. - राहुल गांधी, काँग्रेस नेते

कर लावण्याची पहिली वेळ?

खाद्यपदार्थांवर कर लावण्याची ही काही पहिली वेळ आहे का? यापूर्वीही अनेक राज्य यावर कर आकारत होते. पंजाबने तर २००० कोटी रुपये खरेदी शुल्काद्वारे कमावले आहेत. उत्तर प्रदेशनेही ७०० कोटी रुपये तिजोरीत भरले आहेत.     - निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री

राज्यही आकारत खाद्यपदार्थांवर होते कर? 
राज्य         व्हॅट
पंजाब         ५.५% 
महाराष्ट्र     ६% 
छत्तीसगड     ५% 
तेलंगणा     ५% 
ओडिशा     ५% 
आंध्र प्रदेश     ५% 
केरळ         ५%*  
मणिपूर     ५% 
उत्तर प्रदेश     ४% 
हरयाणा     ४% 
हिमाचल     ४% 
बिहार         १% 
दमन-दिऊ     ५% 
(*पॅकेजिंग केलेले बासमती तांदूळ)

Web Title: nirmala sitharaman clear that there is no gst on other food items including spare grains curd lassi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.