Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशात टोमॅटो कधी स्वस्त होणार? केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत दिली माहिती

देशात टोमॅटो कधी स्वस्त होणार? केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत दिली माहिती

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी संसदेत टोमॅटो महागाईवरुन माहिती दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 03:36 PM2023-08-10T15:36:10+5:302023-08-10T15:38:32+5:30

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी संसदेत टोमॅटो महागाईवरुन माहिती दिली.

nirmala sitharaman says tomato prices expected to come down in coming days | देशात टोमॅटो कधी स्वस्त होणार? केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत दिली माहिती

देशात टोमॅटो कधी स्वस्त होणार? केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत दिली माहिती

गेल्या काही दिवसापासून देशात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. काही ठिकाणी टोमॅटो २०० रुपये किलोवर गेले. जवळपास २ महिन्यांपासून टोमॅटो महाग आहेत. टोमॅटोच्या दरात घसरण होण्याबाबतचे सरकारचे आतापर्यंतचे सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत. दरम्यान, गुरुवारी संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी टोमॅटो संदर्भात अपडेट दिली. 

बँकांकडून कर्ज घेणाऱ्यांसाठी खुशखबर! सिस्टीम बदलणार; RBI'ने केली मोठी घोषणा

संसदेत निर्मला सीतारामन म्हणाल्या की, येत्या काही दिवसांत टोमॅटोच्या किमती झपाट्याने घसरतील. या आठवड्यापासून दिल्ली एनसीआरमध्ये अनुदानासह टोमॅटो ७० रुपये किलोने विकले जातील.

सीतारामन म्हणाल्या की, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली-एनसीआरमध्ये 8 लाख किलोपेक्षा जास्त टोमॅटो स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. लोकांना दिलासा देण्यासाठी एनसीसीएफकडून दिल्ली-एनसीआरमध्ये मोबाईल व्हॅनद्वारे स्वस्त दरात टोमॅटोची विक्री केली जात आहे. याशिवाय, दिल्ली-एनसीआर लोकांसाठी ONDC प्लॅटफॉर्मवर टोमॅटोही स्वस्तात मिळतात.

बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये टोमॅटो स्वस्त दरात विकले जात असल्याचे त्यांनी सांगितले. उत्पादनात घट झाल्यामुळे टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. मात्र आता शेतातील टोमॅटो वेगाने मंडईत पोहोचत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये टोमॅटोचा घाऊक दर 100 रुपये किलोच्या खाली पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच ते इतर बाजारपेठेतही पोहोचेल अशी अपेक्षा आहे. 

कोलार मंडईपासून दिल्लीपर्यंत टोमॅटोची आवक 85 रुपये किलोने होत आहे. याशिवाय नेपाळमधून टोमॅटो आयात केले जात असून ते शुक्रवारपर्यंत वाराणसी, लखनऊ आणि कानपूरसारख्या शहरांमध्ये पोहोचतील. यासोबतच एनसीसीएफच्या मेगा सेलमध्ये अनुदानित टोमॅटो 70 रुपये किलो दराने विकले जात आहेत, असंही निर्मला सीतारामन म्हणाल्या.

Web Title: nirmala sitharaman says tomato prices expected to come down in coming days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.