नवी दिल्लीः भारतीय विमानतळांचा PPP(Public Private Partnership) मॉडेलद्वारे विकास करणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली आहे. 6 पैकी 3 विमानतळे यापूर्वीच PPPअंतर्गत विकसित करण्यात आलेली असून, दुस-या टप्प्यात 6 विमानतळांचा PPP द्वारे कायापालट करण्यात येणार आहे. तसेच 12 विमानतळांत 13 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत. त्यामुळे नागरी वाहतूक अधिक सुकर होईल आणि विमान वाहतूक क्षेत्राला दरवर्षी 1 हजार कोटींचा फायदा होणार असल्याचंही निर्मला सीतारामण यांनी सांगितलं आहे.
भारतीय एअर स्पेसच्या वापरावरील निर्बंध दूर केले जातील. एअर स्पेसवरील निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत. नागरी विमानसेवेसाठी केवळ 60 टक्के भारतीय हवाई क्षेत्र उपलब्ध असल्यामुळे विमानांना दीर्घ पल्ल्याचा मार्ग स्वीकारावा लागतो. यात विमान कंपन्यांचे जास्तीचं इंधन खर्ची होते आणि प्रवासही महाग होतो. हा अडथळा दूर केला जाणार असल्याचंही निर्मला सीतारामण म्हणाल्या आहेत.
Airports Authority of India has awarded 3 airports out of 6 bid for operation & maintenance on Public-Private Partnership (PPP) basis. Additional investment by private players in 12 airports in fIrst & second rounds expected around Rs 13,000 crores: FM Nirmala Sitharaman. pic.twitter.com/KwyPlYGfTz
— ANI (@ANI) May 16, 2020
मार्ग बदलल्यामुळे विमानाला इच्छितस्थळी लवकर पोहोचता येणार असून, इंधनाचीही बचत होणार आहे. भारतीय हवाई हद्दीचा वापर स्वस्त झाल्यानंतर वर्षाला 1 हजार कोटी मिळतील. सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर देशातील सहा विमानतळांचा लिलाव होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
Restrictions on the utilisation of Indian Air Space will be eased so that civilian flying becomes more efficient. Will bring a total benefit of Rs. 1000 crores per year for the aviation sector: Finance Minister Nirmala Sitharaman. #EconomicPackagepic.twitter.com/oVnF35SJ1J
— ANI (@ANI) May 16, 2020
येत्या दोन महिन्यांत हवाई क्षेत्राचा वापर स्वस्त होणार असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Nirmala Sitharaman Live: कोळशाच्या साठवणुकीसाठी ५० हजार कोटी रुपयांची तरतूद; केंद्राचा मोठा निर्णय
देवगडच्या 'या' मुलीला काल शिक्का मिळाला अन् तिचा हात आज असा झाला- नितेश राणे
लष्करात तीन वर्ष ट्रेनिंग देण्याच्या उपक्रमाचे आनंद महिंद्रांकडून समर्थन; म्हणाले...
कौतुकास्पद! एका रुपयात इडली विकणार्या अम्माला शेफ विकास खन्नांचं सरप्राईज गिफ्ट
गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पाक राबवत असलेल्या योजनांना भारताचा विरोध; इम्रान सरकारला दिला गंभीर इशारा
Lockdown 4.0चं काऊंटडाऊन; आपल्या राज्याला कुठल्या सवलती मिळणार?
CoronaVirus news : कोरोनाच्या समूह संसर्गाची भीती, लॉकडाऊन हटवणं पडू शकतं महागात- तज्ज्ञ
अमेरिका मैत्रीला जागला! भारताला व्हेंटिलेटर देणार अन् मिळून कोरोनाला हरवणार
प्रवासी मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला ट्रकची धडक, 24 जणांचा मृत्यू
...म्हणून विरोधी पक्षाने सावध राहायला हवे, शिवसेनेचा भाजपाला टोला