Lokmat Money > बिझनेस न्यूज > नीरव मोदीच्या कंपनीची दिवाळखोरी रोखणार

नीरव मोदीच्या कंपनीची दिवाळखोरी रोखणार

पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार कोटींचा महाघोटाळा करणारा नीरव मोदीच्या फायरस्टार डायमंड कंपनीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 03:48 AM2018-03-27T03:48:59+5:302018-03-27T03:48:59+5:30

पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार कोटींचा महाघोटाळा करणारा नीरव मोदीच्या फायरस्टार डायमंड कंपनीची

Nirvana Modi's company will stop bankruptcy | नीरव मोदीच्या कंपनीची दिवाळखोरी रोखणार

नीरव मोदीच्या कंपनीची दिवाळखोरी रोखणार

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार कोटींचा महाघोटाळा करणारा नीरव मोदीच्या फायरस्टार डायमंड कंपनीची अमेरिकेतील दिवाळखोरी प्रक्रिया रोखण्यासाठी कायदेशीर मार्ग चोखाळण्याचा प्रयत्न भारत सरकारच्या कंपनी व्यवहार मंत्रालयाने चालविला आहे.
राष्टÑीय कंपनी लवादाने (एनसीएलटी) ६0 जणांना, तसेच त्यांच्या कंपन्यांना आपल्या मालमत्ता विकण्यास नुकतीच मनाई केली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, फायरस्टार डायमंड्सने अमेरिकेत दिवाळखोरी प्रक्रियेसाठी अर्ज केला आहे. एनसीएलटीने मालमत्ता विक्रीस मनाई केलेल्या कंपन्यांच्या यादीत फायरस्टारच्या मातृ कंपनीचाही समावेश आहे. घोटाळ्यातील पैसा फायरस्टारमध्येही वळता केलेला असू शकतो. त्यामुळे या दिवाळखोरी प्रक्रियेविरुद्ध कायदेशीर मार्ग चोखाळण्याचा विचार सुरू आहे. या खटल्यात प्रतिवादी होण्याचा विचार पंजाब नॅशनल बँकेकडूनही केला जात आहे, अशीही माहिती मिळत आहे.

Web Title: Nirvana Modi's company will stop bankruptcy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.