Join us  

नीता अंबानींना पगार मिळत नव्हता, पण एका मीटिंगसाठी किती रुपये मिळायचे? जाणून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 8:33 AM

नीता अंबानी यांनी काही दिवसापूर्वी रिलायन्स बोर्ड ऑफ डायरेक्टर्समधील आपल्या तीन मुलांना RIL बोर्डात नियुक्त करण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे, सध्या श्रीमंतीच्या यादीत मुकेश अंबानी टॉप टेनमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत.  ३६० वन हेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२३ नुसार मुकेश अंबानी यांची संपत्ती २ टक्क्यांनी वाढून ८.८ लाख कोटी झाली आहे,  मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांचाही उद्योगात मोठा वाटा आहे, नीता अंबानी अनेक वर्षे रिलायन्स संचालक मंडळाच्या सदस्य राहिल्या. नीता अंबानी यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली.

iPhone 15 सीरीजमधून Apple ची बंपर कमाई; एक फोन बनवण्यासाठी येतो इतका खर्च...

नीता अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बोर्ड मधील त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे ईशा, आकाश आणि अनंत अंबानी - यांना संचालक मंडळावर नियुक्त करण्याचा मार्ग मोकळा झाला.

मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना रिलायन्स संचालक मंडळाच्या सदस्या म्हणून मासिक वेतन मिळाले नाही. नीता अंबानी यांना RIL बोर्डाच्या बोर्ड आणि कमिटीच्या बैठकांसाठी फक्त बैठक फी दिली, पगार दिला नाही.

RIL च्या वार्षिक अहवालानुसार, नीता अंबानी यांना बोर्डाच्या बैठकीसाठी सुमारे ६ लाख रुपये एका बैठकीसाठी मानधन मिळत होते आणि २०२२-२०२३ या आर्थिक वर्षासाठी त्यांना २ कोटी रुपयांचे कमिशन मिळाले. नीता अंबानी इतर मोबदल्यासाठी किंवा RIL कडून स्टॉक ऑप्शन्स, बोनस किंवा कमिशन यासारख्या लाभांसाठी पात्र नव्हत्या.

ईशा अंबानी, आकाश अंबानी, आणि अनंत अंबानी यांची RIL BoD मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांचे करार त्यांच्या आई नीता यांच्या प्रमाणेच असतील, म्हणजे त्यांना कोणताही पगार दिला जाणार नाही, फक्त मीटिंगसाठी फी आणि वार्षिक कमिशन देण्यात येणार आहे.

रिलायन्सने एका अहवालात म्हटले आहे की, “त्यांना मंडळाच्या किंवा त्यांच्या समित्यांच्या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी किंवा बोर्डाने ठरवल्याप्रमाणे इतर कोणत्याही बैठकांसाठी, बोर्ड आणि इतर बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी फी आणि नफा-संबंधित कमिशन देण्यात येणार आहे.

रिलायन्सच्या संचालक मंडळाचा राजीनामा देण्याव्यतिरिक्त, नीता अंबानी यांनी धीरूभाई अंबानी इन्स्टिट्यूटमधील उच्च पदावरूनही राजीनामा दिला असून त्यांनी मुलगी ईशा अंबानीकडे हे पद सोपवले आहे.

टॅग्स :नीता अंबानीरिलायन्समुकेश अंबानी