रिलायन्स इंडस्ट्रीज आणि डिस्ने विलीनीकरण डील संदर्भात नवीन अपडेट्स समोर आली आहे. रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना या डीलमुळे स्थापन झालेल्या संस्थेचे अध्यक्ष बनवले जाऊ शकते. सध्या नीता अंबानी रिलायन्स फाऊंडेशनची जबाबदारी सांभाळत आहेत.
मिळेलेल्या माहितीनुसार, रिलायन्स आणि वॉल्ट डिस्ने लवकरच त्यांच्या विलीनीकरणाच्या कराराची घोषणा करू शकतात. या अहवालात आज २८ फेब्रुवारी म्हणजेच बुधवारी यासंदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. यासोबतच विलीनीकरणानंतर नीता अंबानी यांना नव्या कंपनीचे अध्यक्षपद बनवले जाण्याची शक्यता आहे. नीता अंबानी या रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आहेत.नीता अंबानी या रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आहेत आणि सध्या त्यांचे संपूर्ण लक्ष या फाउंडेशनवर आहे. यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी गेल्या वर्षी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बोर्डाचा राजीनामा दिला.
लहानपणी वाटलेले मी कधीच लग्न करणार नाही, राधिका स्वप्नांची राणी; व्यक्त झाले अनंत अंबानी
या कंपन्यांच्या विलीनीकरणानंतर स्थापन झालेल्या कंपनीचा रिलायन्सकडे ५१-५४ टक्के हिस्सा असू शकतो, तर जेम्स मर्डोक आणि उदय शंकर यांच्यातील संयुक्त उपक्रम बोधी ट्री ९ टक्के हिस्सा ठेवण्यास तयार आहे. हा करार यशस्वी झाल्यानंतर वॉल्ट डिस्नेकडे ४० टक्के हिस्सा असेल. यापूर्वी नवीन कंपनीमध्ये रिलायन्सची ६१ टक्के भागीदारी असू शकते, असं सांगण्यात येत होते.
रिलायन्स इंडस्ट्रीजचा व्यवसाय तेल क्षेत्रापासून रिटेलपर्यंत विस्तारला आहे आणि आता मीडिया मनोरंजन क्षेत्रातही पाऊलं ठेवले आहे. वॉल्ट डिस्नेसोबतचा करारही या दिशेने उचलले जाणारे एक मोठे पाऊल आहे. नवीन संस्थेच्या अध्यक्षपदी नीता अंबानी यांच्या नियुक्तीबाबत रिलायन्सकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.