Join us  

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या भाषणातूनही करतात कमाई, जाणून घ्या कशी? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2023 6:10 PM

Gadkari YouTube Income: नितीन गडकरी यांनी 2015 मध्ये आपले युट्यूब चॅनल सुरू केले होते

नवी दिल्ली : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे सोशल मीडियाचे मास्टर आहेत. युट्यूबवरून (YouTube ) ते दरमहा 4 लाख रुपयांची कमाई करतात. त्यांनी स्वतः इंडियन इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह (IEC) 2023 मध्ये ही माहिती दिली आहे. युट्यूबवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत आणि आपले भाषण, लेक्चर आणि व्हिडिओंद्वारे दर महिन्याला लाखोंची कमाई करत असल्याचे त्यांनी सांगितले.

"लोकांना माझ्या यूट्यूब चॅनेलवरील व्हिडिओ खूप आवडतात. माझ्या प्रत्येक व्हिडिओला हजारो व्ह्यूज, लाईक्स आणि कमेंट्स येतात. तसेच, माझ्या यूट्यूब चॅनेलवर 5 लाखांहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत. आजकाल सोशल मीडिया हा कमाईचा सोपा मार्ग बनला आहे. प्रत्येकजण आपल्या टॅलेंटद्वारे इंस्टाग्राम  (Instagram) आणि यूट्यूबवरून कमाई करतो", असे इंडियन इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह (IEC) 2023 मध्ये नितीन गडकरी म्हणाले. 

याचबरोबर, नितीन गडकरी यांनी 2015 मध्ये आपले युट्यूब चॅनल सुरू केले होते. यातून ते आता दर महिन्याला 4 लाख रुपये कमावतात. युट्यूबवरून नितीन गडकरींना दरमहा 4 लाख रुपये रॉयल्टी म्हणून मिळतात. दरम्यान, कोरोना काळात माझ्या चॅनेलवर बराच कंटेंट शेअर करण्यात आला, जो प्रेक्षकांना खूप आवडला आहे, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इंडियन इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह 2023 मध्ये सांगितले. 

दरम्यान, नितीन गडकरींना स्वयंपाक करायला आवडतो. त्यामुळे कोरोनाच्या काळात त्यांनी आपल्या चॅनलवर कुकिंगपासून व्हिडिओद्वारे लेक्चर द्यायला सुरुवात केली. केवळ कोरोनाच्या काळात त्यांनी सुमारे 950 ऑनलाइन लेक्चर दिली आहेत. त्यांनी भारतातच नव्हे तर परदेशात शिकणाऱ्या मुलांनाही लेक्चर दिली. नंतर त्यांनी सर्व लेक्चर आपल्या चॅनलवर विद्यार्थ्यांसाठी ठेवली आहेत.

टॅग्स :नितीन गडकरीयु ट्यूबव्यवसाय