Lokmat Money > बिझनेस न्यूज > Niva Bupa Health IPO: स्विगीनंतर निवा बुपालाही थंड प्रतिसाद, आज अलॉटमेंट होणार फायनल; कसं पाहाल?

Niva Bupa Health IPO: स्विगीनंतर निवा बुपालाही थंड प्रतिसाद, आज अलॉटमेंट होणार फायनल; कसं पाहाल?

Niva Bupa Health IPO : हा आयपीओ ७ नोव्हेंबर रोजी बोलीसाठी खुला झाला आणि ११ नोव्हेंबर रोजी बंद झाला. या आयपीओलादेखील गुंतवणूकदारांकडून थंड प्रतिसाद मिळाला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 12:59 PM2024-11-12T12:59:30+5:302024-11-12T12:59:30+5:30

Niva Bupa Health IPO : हा आयपीओ ७ नोव्हेंबर रोजी बोलीसाठी खुला झाला आणि ११ नोव्हेंबर रोजी बंद झाला. या आयपीओलादेखील गुंतवणूकदारांकडून थंड प्रतिसाद मिळाला होता.

Niva Bupa Health IPO less response to Niva Bupa health insurance ippo after Swiggy final allotment today How do you check allotment status | Niva Bupa Health IPO: स्विगीनंतर निवा बुपालाही थंड प्रतिसाद, आज अलॉटमेंट होणार फायनल; कसं पाहाल?

Niva Bupa Health IPO: स्विगीनंतर निवा बुपालाही थंड प्रतिसाद, आज अलॉटमेंट होणार फायनल; कसं पाहाल?

Niva Bupa Health IPO: निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स लिमिटेडच्या आयपीओ अंतर्गत शेअर्सचं वाटप मंगळवारी अंतिम होण्याची शक्यता आहे. हा आयपीओ ७ नोव्हेंबर रोजी बोलीसाठी खुला झाला आणि ११ नोव्हेंबर रोजी बंद झाला. निवा बुपा हेल्थ इन्शुरन्सच्या आयपीओ वाटपाचा निर्णय झाल्यानंतर कंपनी पात्र गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात १३ नोव्हेंबर रोजी शेअर्स जमा करेल आणि त्याच दिवशी ज्यांना शेअर्स अलॉट झाले नाहीत त्यांना परतावा देईल.

ऑनलाइन स्टेटस कसे तपासावं?

जर तुम्हीही या आयपीओमध्ये बोली लावली असेल तर तुम्ही बीएसई आणि एनएसईच्या वेबसाइट्स आणि आयपीओ रजिस्ट्रारच्या अधिकृत पोर्टलद्वारे निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स आयपीओ अलॉटमेंट स्टेटस ऑनलाइन तपासू शकता. केएफआयएन टेक्नॉलॉजीज ही निवा बुपा आयपीओ रजिस्ट्रार आहे. ऑनलाइन स्टेटस तपासण्यासाठी काय करावं लागेल जाणून घेऊ.

आयपीओ अलॉटमेंट स्टेटस कसं पाहाल?

  • स्टेप १: बीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर जा https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx.
  • स्टेप २: इश्यू टाइपमध्ये इक्विटी निवडा
  • स्टेप ३: इश्यूमध्ये निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स लिमिटेड हे नाव निवडा
  • स्टेप ४: अॅप्लिकेशन नंबर किंवा पॅन क्रमांक एन्टर करा
  • स्टेप ५ : दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.  यानंतर तुमचा निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स आयपीओ अलॉटमेंट स्टेटस स्क्रीनवर दिसेल.
     

रजिस्ट्रारवर अलॉटमेंट स्टेटस कसं पाहाल

  • स्टेप १: आयपीओ रजिस्ट्रारच्या वेबसाइट लिंकवर https://kosmic.kfintech.com/ipostatus/ जा
  • स्टेप २: आयपीओ ड्रॉपडाउन मेनूमध्ये निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स लिमिटेड निवडा
  • स्टेप ३: अर्ज क्रमांक, डीमॅट खातं किंवा पॅन निवडा 
  • स्टेप ४ : निवडलेल्या पर्यायानुसार तपशील एन्टर करा 
  • स्टेप ५: कॅप्चा कोड एन्टर करा आणि सबमिटवर क्लिक करा. तुमचं ऑनलाइन स्टेटस स्क्रीनवर दिसेल.

Web Title: Niva Bupa Health IPO less response to Niva Bupa health insurance ippo after Swiggy final allotment today How do you check allotment status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.