नवी दिल्ली - जर्मनीची कार उत्पादक कंपनी फॉक्सवॅगनविरोधात कोणत्याही प्रकारे जुलमी कारवाई केली जाणार नाही, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केले. सर्वोच्च न्यायालयाच्या या प्रतिपादनामुळे गाड्यांत फसवे उत्सर्जन मापक बसविल्याच्या प्रकरणात कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे.
भारतात विकण्यात आलेल्या फॉक्सवॅगनच्या डिझेल कारमध्ये उत्सर्जन मोजण्याचे फसवे उपकरण बसविल्याचा आरोप आहे. यावरून राष्ट्रीय हरित लवादाने कंपनीला ५00 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. याविरुद्ध कंपनीने सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे.
न्या. एस. ए. बोबडे आणि न्या. एस.अब्दुल नजीर यांच्या पीठाने फॉक्सवॅगनविरोधातील दंडाला स्थगितीही दिली आहे. कंपनीने अंतरिम स्वरूपात दंडाचे १०० कोटी रुपये यापूर्वीच जमा केले आहेत.
कंपनीविरोधात
अनेक देशांत खटले
जर्मन कार उत्पादक कंपनी फॉक्सवॅगनने भारतातीलच नव्हे, तर जगभरातील गाड्यांत उत्सर्जन मोजणारे फसवे उपकरण बसविल्याचे उघडकीस आलेले आहे. याप्रकरणी कंपनीविरुद्ध अनेक देशांत खटले सुरू आहेत. कंपनीच्या डिझेल गाड्यांमधून मोठ्या प्रमाणात घातक वायूंचे उत्सर्जन होत असताना गाड्यांमधील उत्सर्जन मापक उपकरण मात्र कमी उत्सर्जन होत असल्याचे दर्शवीत असे. उत्सर्जनविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हजारो गाड्या कंपनीने अशी चलाखी करून जगभरात विकल्या.
‘फॉक्सवॅगन’विरुद्ध जुलमी कारवाई केली जाणार नाही
जर्मनीची कार उत्पादक कंपनी फॉक्सवॅगनविरोधात कोणत्याही प्रकारे जुलमी कारवाई केली जाणार नाही, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केले.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 04:22 AM2019-05-07T04:22:01+5:302019-05-07T04:22:28+5:30