Lokmat Money > बिझनेस न्यूज > ना कार्ड, ना स्मार्टफोन, आजही पेमेंट कॅशनेच; आशिया-आफ्रिकेत रोखीला पसंती

ना कार्ड, ना स्मार्टफोन, आजही पेमेंट कॅशनेच; आशिया-आफ्रिकेत रोखीला पसंती

आशिया आणि आफ्रिकेतील अधिकांश देशांत आजही रोख व्यवहारांचा जोर कायम आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 10:39 AM2023-05-04T10:39:17+5:302023-05-04T10:40:41+5:30

आशिया आणि आफ्रिकेतील अधिकांश देशांत आजही रोख व्यवहारांचा जोर कायम आहे.

No card, no smartphone, even today payment is by cash; Asia-Africa prefers cash | ना कार्ड, ना स्मार्टफोन, आजही पेमेंट कॅशनेच; आशिया-आफ्रिकेत रोखीला पसंती

ना कार्ड, ना स्मार्टफोन, आजही पेमेंट कॅशनेच; आशिया-आफ्रिकेत रोखीला पसंती

जगभरात सर्वत्र खरेदी-विक्रीसाठी ऑनलाइन माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. दुकानातील खरेदी, सिनेमा तिकीट काढणे किंवा हॉटेलचे बिल... सर्व व्यवहार ऑनलाइन केले जातात. याला अपवाद आहेत पश्चिम, तसेच उत्तर युरोपातील काही देश. या देशांमध्ये आजही रोख स्वरूपातील व्यवहार अधिक लोकप्रिय आहेत. 

स्टॅटिस्टाचा अहवाल जर्मनीसारख्या विकसित देशातही मागच्या वर्षी...

७३% व्यवहार रोखीने झाले आहेत. 

५६% लोकांनी डेबिट कार्ड

१८% मोबाइलने पेमेंट केले. 

नेमका असाच ट्रेंड ऑस्ट्रिया, पोलंड, इटली, स्पेन आणि जपान आदी ३८ देशांमध्ये दिसला. 

आशिया-आफ्रिकेत रोखीला पसंती
आशिया आणि आफ्रिकेतील अधिकांश देशांत आजही रोख व्यवहारांचा जोर कायम आहे. इंडोनेशियामध्ये रोखीला प्राधान्य दिले जाते. कारण तिथे ६६ टक्के लोकांकडे कोणत्याही बँकेचे खाते नाही. पाकिस्तानातही लोक खरेदीसाठी खिशात रोकड घेऊन फिरतात. नायजेरियामध्येही वस्तू खरेदी करताना किंवा सेवा घेताना पेमेंट रोखीने केले जाते. 

डेबिट आणि क्रेडिट कार्ड लोकप्रिय 
नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन, बेनेलक्स, बेल्जियम, लग्जेमबर्ग, नेदरलँड्स, ब्रझील, चिली, दक्षिण कोरिया आणि रशियात कार्डने पेमेंट अधिक लोकप्रिय आहे. अमेरिकेत पसंती डेबिट, कार्डने पेमेंटला आहे.

Web Title: No card, no smartphone, even today payment is by cash; Asia-Africa prefers cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.