लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशात रोख रकमेऐवजी आता मोबाइलवरून व्यवहार करण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळेच जुलैमध्ये यूपीआयवर विक्रमी ६ अब्ज देवघेव व्यवहार झाले आहेत. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्वीट करून ही माहिती दिली.
मोदी यांनी प्रशंसा करताना म्हटले की, जुलैमध्ये यूपीआयवर ६ अब्ज देवाण-घेवाण व्यवहार झाले. सन २०१६ नंतरचे हे सर्वाधिक व्यवहार आहेत. याचाच अर्थ २०१६ चा विक्रम मोडून जुलैमध्ये नवा उच्चांक गाठला गेला आहे.
१०.६२ लाख कोटी रुपयांचे हस्तांतरण
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन
ऑफ इंडियाच्या (एनपीसीआय) आकडेवारीनुसार, जुलैमध्ये
६.२८ अब्ज देवघेव व्यवहार
झाले. त्यातून १०.६२ लाख
कोटी रुपयांचे हस्तांतरण करण्यात आले. यूपीआयचे परिचालन एनपीसीआयकडूनच केले जाते.
बँका किती वाढल्या?
देशात आता अनेक बँका यूपीआयशी जोडून घेत आहेत. त्यामुळेच ऑनलाइन व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. जुलै २०२१ मध्ये यूपीआयसोबत २३५ बँका होत्या. २०२२ मध्ये बँकांची संख्या ३३८ वर पोहोचली आहे.