नवी दिल्ली : देशातील सर्वांत मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणार्या स्टेट बँक आॅफ इंडियाने भांडवल वाढीच्या उद्देशाने कोणतीही विशेष कंपनी स्थापन करण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट केले. अर्थ मंत्रालयाने बाजार भांडवल जमविण्यासाठी या पर्यायाचा विचार करण्याचा प्रस्ताव दिला होता. स्टेट बँक आॅफ इंडिया अर्थात एसबीआयच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य म्हणाल्या, ‘बाजारातून भांडवल जमविण्यासाठी विशेष कंपनी स्थापन करण्याचा प्रस्ताव आमच्या विचाराधीन नाही.’ केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी गेल्या आठवड्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँक प्रमुखांची बैठक बोलावली होती. यावेळी बाजारातून भांडवल जमविण्यासाठी विशेष कंपनी स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्या पुढे म्हणाल्या, भांडवल जमविण्यासाठी होल्डिंग कंपनी स्थापन करण्याचा विचार आहे. मात्र, याबाबत सध्या कोणताही ठोस विचार झालेला नाही. केंद्रातील सत्तांतरच्या पार्श्वभूमीवर एसबीअीायने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा ठरतो. आर्थिक आघाडीवर नवे सरकार घेणारी भूमिकाही आता महत्त्वाची ठरेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
एसबीआय स्थापणार नाही भांडवली कंपनी
देशातील सर्वांत मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणार्या स्टेट बँक आॅफ इंडियाने भांडवल वाढीच्या उद्देशाने कोणतीही विशेष कंपनी स्थापन करण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट केले.
By admin | Published: May 19, 2014 04:35 AM2014-05-19T04:35:29+5:302014-05-19T04:37:01+5:30