नवी दिल्ली : भारतात इस्लामिक/ शरीया किंवा व्याजविरहित बँकिंग सेवा सुरू करण्यास कोणतीही मुदत ठरवून देण्यात आलेली नाही, असे रिझर्व्ह बँकेने येथे म्हटले. इस्लाममध्ये व्याज आकारणे निषिद्ध मानण्यात आलेले आहे. या तत्त्वानुसार व्यवहार होणाऱ्या आर्थिक व्यवस्थेला इस्लामिक किंवा शरीया बँकिंग म्हणतात. सध्या ज्या बँका आहेत त्यातच ‘इस्लामिक खिडकी’ सुरू करून शरीया किंवा इस्लामिक बँकेची ओळख करून देण्याचा याआधी रिझर्व्ह बँकेने विचार केला होता.
इस्लामिक किंवा शरीया बँकिंगबाबत माहितीच्या अधिकारात करण्यात आलेल्या अर्जाला दिलेल्या उत्तरात रिझर्व्ह बँकेने आम्ही याबाबत कोणतेही पाऊल अजून उचललेले नाही व त्यासाठी कोणतीही मुदत ठरवून घेतलेली नाही, असे म्हटले.
भारतात व्याजविरहित बँकिंग व्यवस्था सुरू करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने कायदेशीर, तांत्रिक व नियामक प्रश्नांचा अभ्यास रिझर्व्ह बँकेत स्थापन झालेल्या आंतर विभागीय गटाने केला व त्याचा अहवाल केंद्र सरकारला बँकेने फेब्रुवारी २०१६ मध्ये सादर केला होता.
इस्लामिक बँकिंगसाठी मुदत ठरवलेली नाही
भारतात इस्लामिक/ शरीया किंवा व्याजविरहित बँकिंग सेवा सुरू करण्यास कोणतीही मुदत ठरवून देण्यात आलेली
By admin | Published: April 10, 2017 12:41 AM2017-04-10T00:41:28+5:302017-04-10T00:41:41+5:30