Join us

Petrol, Diesel Price Today: तीन तिघाडा...! पेट्रोल, डिझेलने आज फसविले; दरवाढ झालीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 7:39 AM

Petrol and diesel prices on 24 March 2022: चार महिन्यांपूर्वी पेट्रोल, डिझेलने गाठलेले दर आता अवघ्या काही दिवसांतच पार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंधनाच्या दरवाढीला सुरुवात झाली असून दरवाढीचा वेग एवढा प्रचंड आहे की रुपयावर जाऊन पोहोचला आहे.

चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होऊ लागली होती. रोज ८५ पैसे अशी वाढ होत असल्याने डिझेल पुन्हा शंभरी पार करेल आणि पेट्रोल पुन्हा विक्रम करेल असे वाटत होते. तज्ज्ञ, विरोधकही इंधनाचे दर १५-२०रुपयांनी वाढणार असल्याचे भाकित करत होते. परंतू आज तिसऱ्या दिवशी पेट्रोल कंपन्यांनी या सर्वांना खोटे पाडले आहे. 

चार महिन्यांपूर्वी पेट्रोल, डिझेलने गाठलेले दर आता अवघ्या काही दिवसांतच पार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंधनाच्या दरवाढीला सुरुवात झाली असून दरवाढीचा वेग एवढा प्रचंड आहे की रुपयावर जाऊन पोहोचला आहे. चार महिन्यांपूर्वी दिवसाला २५-३० पैशांनी वाढणारे दर आज ८५ पैशांनी वाढू लागले आहेत. हे पाहिल्यास पुढील चार दिवसांत डिझेल शतक ठोकण्याची शक्यता होती. परंतू आज पेट्रोल, डिझेलचे दर वाढलेच नाहीत. 

सलग दुसऱ्या दिवशीही पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली होती. पेट्रोलच्या दरात ८४ तर डिझेलच्या दरात ८५ पैशांची वाढ झाली. गेल्या दोन दिवसांत पेट्रोल आणि डिझेल १.६०-१.७० पैशांनी वाढले होते. आजही दर वाढेल अशी अपेक्षा होती. परंतू आज एका पैशानेही दरवाढ झालेली नाही. उलट फक्त दिल्लीमध्ये सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या दरात १ रुपयाने वाढ झाली आहे. 

पुन्हा दरवाढ सुरु...मोदी सरकारने दिवाळीच्या पूर्वसंध्येला स्वस्ताईचा पाऊस लावत एक्साईज ड्युटीमध्ये पेट्रोलला 5 रुपये आणि डिझेलला 10 रुपयांची कपात केली होती. कपातीपूर्वी हे दर पेट्रोल 117.52 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 106.55 रुपयांवर गेले होते. साठ-पासष्ठ रुपयांवर असलेले डिझेल आणि ७५-८० वर असलेले पेट्रोल पाहता पाहता शंभरी पार गेले होते. यानंतर दिवाळीचे औचित्य साधून विधानसभा निवडणुकांसाठी सरकारने दर थेट उतरविले होते, गेले चार महिने हे दर स्थिर ठेवण्यात आले होते जे आता पुन्हा वाढू लागले आहेत.

टॅग्स :इंधन दरवाढपेट्रोलडिझेल