Join us  

ICICI: इन्कम टॅक्स भरत नसाल तरी मिळेल होम लोन; ही बँक ऑन दी स्पॉट मंजूर करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 2:08 PM

ICICI Home Finance चे सीईओ अनिरुद्ध कमानी यांनी सांगितले की, बिग फ्रीडम महिन्यांतर्गत आमच्या शाखेतच गृह कर्ज मंजूर केले जाईल. त्या शाखांमध्ये आमचे स्थानिक प्रतिनिधी कमीत कमी कागदपत्रांवर कर्ज उपलब्ध करण्यासाठी मदत करतील. 

तुम्हाला कोणत्याही कारणासाठी कर्ज (Loan) हवे असेल तर आधी तुमचे उत्पन्न काय आहे हे कागदोपत्री दाखवावे लागते. यासाठी एकतर कंपन्यांचा फॉर्म १६ किंवा आयकर विवरण पत्र (Income tax return) तुम्हाला बँकेला द्यावेच लागते. अन्यथा बँका तुम्हाला समोर उभे देखील करत नाहीत. सरकारीच नाही तर खासगी बँकांना देखील त्यांचे कर्ज बुडले तर याची भीती असते. यामुळे छोटे छोटे व्यायवसायिक, फेरीवाले किंवा ज्यांचे उत्पन्न नोंद होत नाही असे हातावर पोट असलेले लोक कर्ज घेऊ शकत नाहीत. (ICICI Home Finance launches on-the-spot home loan for workers having no ITR)

या लोकांसाठी आयसीआयसीआय होम फायनान्स (ICICI Home Finance) ने नवी योजना आणली आहे. स्वत:छा छोटा मोठा कामधंदा असणारे, कामगार यांच्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. यासाठी या लोकांना त्यांचे उत्पन्न दाखविण्यासाठी आयकर रिटर्न भरल्याचे पुरावे द्यावे लागणार नाहीत. त्यांना ऑन स्पॉट थेट गृह कर्ज दिले जाणार आहे. 

ICICI Home Finance ही आयसीआयसीआय बँकेचीच उप कंपनी आहे. कंपनीने सांगितले की, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ‘बिग फ्रीडम मंथ’ अनुसार ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या लाभ आयटीआरचे कागदपत्र नसलेल्या लोकांना होणार आहे. 

फक्त पॅन कार्ड लागणार...कंपनीने सांगितले की, इलेक्ट्रीशिअन, सुतार, प्लंबर, शिंपी, चित्रकार, ऑटो मेकॅनिक, ऑटो, टॅक्सी चालक आणि अन्य लोक यासाठी पात्र असणार आहेत. त्यांना फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड आणि सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट उपलब्ध करावे लागणार आहे. 

ICICI Home Finance चे सीईओ अनिरुद्ध कमानी यांनी सांगितले की, बिग फ्रीडम महिन्यांतर्गत आमच्या शाखेतच गृह कर्ज मंजूर केले जाईल. त्या शाखांमध्ये आमचे स्थानिक प्रतिनिधी कमीत कमी कागदपत्रांवर कर्ज उपलब्ध करण्यासाठी मदत करतील. 

या लोकांना त्यांच्या घरांसाठी पंतप्रधान आवास योजनेचाची लाभ देण्यात येईल. यासाठी त्यांनी पीएमएवाय योजनेच्या अटीमध्ये बसले पाहिजे. या योजनेतून 2.67 लाख रुपये सबसिडी दिली जाते.  

टॅग्स :आयसीआयसीआय बँकघरबँकइन्कम टॅक्स