Join us  

Petrol : पेट्रोलची किंमत कितीही वाढो, पण तुम्हाला स्वस्तच मिळेल! जाणून घ्या खास ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 11:40 PM

आम्ही आपल्याला एक खास जुगाड सांगणार आहोत. याच्या सहाय्याने आपण पेट्रोल खरेदीवर पैशांची बचत करू शकतात.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. पण, असे असले तरी पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडलेले आहेत. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये, तर डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर एवढा आहे. एवढेच नाही, तर अनेक ठिकाणी पेट्रोलचा दर याहूनही अधिक आहे. असे असताना, जर आपल्याला थोड्या कमी किमतीत पेट्रोल मिळावे, असे वाटत असेल, तर आम्ही आपल्याला एक खास जुगाड सांगणार आहोत. याच्या सहाय्याने आपण पेट्रोल खरेदीवर पैशांची बचत करू शकतात.

यासाठी आपण बीपीसीएल एसबीआय क्रेडिट कार्डचा वापर करू शकता. याच्या सहाय्याने आपल्याला पेट्रोल खरीदवर बचत करता येऊ शकते. आपण या कार्डचा वापर जेवढा अधिक कराल, तेवढीत तुमची बचतही होईल.

बीपीसीएल एसबीआय क्रेडिट कार्डने आपण संपूर्ण देशभरात कुठल्याही बीपीसीएल पेट्रोल पंपावर पेट्रोल अथवा डिझेल खरेदीवर 4.25 टक्के व्हॅल्यू-बॅकचा लाभ मिळवू शकता. यात रिवॉर्ड प्वॉइंट आणि सरचार्ज सूटचाही समावेश आहे. आपल्याला खरेदीवर 13x रिवॉर्ड प्वॉइंट मिळतील. जो एकूण 4.25 टक्क्यांच्या व्हॅल्यू-बॅकच्या 3.25 टक्क्यां एवढा आहे.  एवढेच नाही, तर 4000 रुपयांपर्यंतच्या प्रत्येक ट्रांझेक्शनवर 1 टक्का फ्यूअल सरचार्ज माफ होतो. एका बिलिंग सायकलमध्ये आपण जास्तीत जास्त 100 रुपयांची सरचार्ज सूट मिळवू शकता. जे 1200 रुपयांच्या वार्षिक बचतीएवढा आहे. हे दोन्ही लाभ जोडून बघितल्यास आपल्याला पेट्रोल अथवा डिझेल थोडे स्वस्तात भेटल्यासारखे वाटेल. खरे तर, हा लाभ आपल्याला केवळ बीपीसीएल पेट्रोल पंपावरच मिळेल.

महत्वाचे म्हणजे, बँक हे कार्ड मोफत देत नाही. या कार्डची जॉइनिंग फीस 499 रुपये एवढी आहे. रिन्यूअल फीसही एवढीच आहे. मात्र या कार्डसोबत 500 रुपयांचे वेलकम गिफ्ट देखील मिळते. जॉइनिंग फीस जमा केल्यानंतर, आपल्याला 2,000 अॅक्टिव्हेशन बोनस रिवार्ड पॉइंट्स मिळतील. ते 500 रुपये किंमती एवढे असतील. रिवॉर्ड पॉइंट्स जॉइनिंग फीस पैसे जमाकेल्यानंतर 20 दिवसांनंतर क्रेडिट केले जातात. हे बीपीसीएल आउटलेट्सपासून इंधन खरेदी करण्यासाठी वापरले जाऊ शकते. अर्थात या कार्डपासून आपण 500 रुपयांचे फ्री पेट्रोल अथवा डिझेलही खरेदी करू शकतात. 

टॅग्स :पेट्रोलडिझेलइंधन दरवाढ