Join us

नको मोबाइल अन् टीव्ही, यंदा घेऊ सोने किंवा घर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2023 6:51 AM

सणासुदीचा हंगाम उंबरठ्यावर आला आहे.

नवी दिल्ली : सणासुदीचा हंगाम उंबरठ्यावर आला आहे. महागाईत वाढ झालेली असली तरीही जाेरदार खरेदी हाेण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यंदा लाेकांनी खरेदी करणाऱ्या वस्तूची माेठी यादी तयार केली आहे. मात्र, यंदा या यादीत थाेडा बदल दिसू शकताे. इलेक्ट्राॅनिक वस्तूंऐवजी यावेळी लाेकांचे प्राधान्य साेने व स्थावर मालमत्ता खरेदीला प्राधान्य आहे.

ब्राेकिंग आणि बॅंकिंग क्षेत्रातील कंपनी ‘यूबीएस’ने यासंदर्भात सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार, ५२ टक्के लाेकांना साेने व संपत्ती खरेदी करायची आहे. त्यांचे बजेट मात्र ५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

७०% भारतीयांची गेल्या वर्षीपेक्षा जास्त खरेदीची याेजना आहे.

१८% लाेक करतील गेल्या वर्षीइतकाच खर्च

१२% लाेक कमी खर्च करतील.

या वस्तूंची हाेणार  खरेदी

स्मार्टफाेन, वाहन, कार, एसी, टीव्ही, रेफ्रिजरेटर, लॅपटाॅप इत्यादी.

टॅग्स :सोनं