Lokmat Money > बिझनेस न्यूज > १ मे पासून बंद होणार Unwanted Calls, सरकारने दिला मोठा आदेश; ग्राहकांना होणारा मनस्ताप थांबणार

१ मे पासून बंद होणार Unwanted Calls, सरकारने दिला मोठा आदेश; ग्राहकांना होणारा मनस्ताप थांबणार

No More Spam Calls TRAI New Rule: आता १ मे पासून तुमच्या फोनवर नको असलेले कॉल येणे बंद होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 05:01 PM2023-03-28T17:01:53+5:302023-03-28T17:03:24+5:30

No More Spam Calls TRAI New Rule: आता १ मे पासून तुमच्या फोनवर नको असलेले कॉल येणे बंद होईल.

no more unwanted spam calls from 1st may trai mandate new rules for telcos | १ मे पासून बंद होणार Unwanted Calls, सरकारने दिला मोठा आदेश; ग्राहकांना होणारा मनस्ताप थांबणार

१ मे पासून बंद होणार Unwanted Calls, सरकारने दिला मोठा आदेश; ग्राहकांना होणारा मनस्ताप थांबणार

No More Spam Calls TRAI New Rule: आता १ मे पासून तुमच्या फोनवर नको असलेले कॉल येणे बंद होईल. लोकांना होणारा मनस्ताप लक्षात घेऊन ट्रायने मोबाइल कंपन्यांना कडक निर्देश दिले आहेत. कंपन्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह स्पॅम फिल्टर्स बसवण्यास सांगण्यात आले आहे.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) टेलिकॉम कंपन्यांना १ मे पर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सुसज्ज स्पॅम फिल्टर बसवण्यास सांगितले आहे, जेणेकरून लोकांना त्रास देणारे अनवॉण्डेट कॉल नेटवर्कवरच ब्लॉक केले जातील.

सर्वसामान्यांना होणार फायदा
ट्रायच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सुसज्ज स्पॅम फिल्टर नेटवर्कवरच कॉल्स थांबवतील, म्हणजेच असे कॉल सामान्य लोकांच्या फोन नंबरवर पोहोचणार नाहीत. याचा फायदा असा होईल की मीटिंग, हॉस्पिटल किंवा महत्त्वाच्या कामाच्या वेळी तुम्हाला त्रास देणारे अनवॉण्डेट कॉल किंवा स्पॅम कॉल्स यापुढे त्रास देऊ शकणार नाहीत. त्यापूर्वी या कॉल्सचे कनेक्शन खंडित केले जाईल.

कंपन्यांचा असेल एक कॉमन प्लॅटफॉर्म
या सेवेसाठी कंपन्यांना कॉमन प्लॅटफॉर्म वापरावा लागणार आहे. देशातील विविध टेलिकॉम नेटवर्कमुळे, हे प्लॅटफॉर्म सर्व नेटवर्कवरील नको असलेले किंवा स्पॅम कॉल्स ब्लॉक करण्यात मदत करेल. कंपन्यांना या प्लॅटफॉर्मवर ब्लॉक केलेल्या नंबरची माहिती द्यावी लागेल, जे लोकांना स्पॅम किंवा नको असलेले कॉल करतात. ही कारवाई पूर्ण करण्यासाठी कंपन्यांना १ मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. १ मे नंतर अशा नंबरवरून येणारे कॉल्स फक्त नेटवर्कवर ब्लॉक करावे लागतील.

बँक, आधार इत्यादींसाठी नवीन क्रमांक जारी होणार
TRAI ने असेही स्पष्ट केले आहे की बँक, आधार किंवा इतर कोणत्याही अत्यावश्यक सेवेशी संबंधित संदेश आणि कॉलसाठी नंबरची स्वतंत्र मालिका दिली जाईल. इतर सर्व नंबर ब्लॉक केले जातील. याचा अर्थ आता हे सर्व एसएमएस आणि कॉल्स केवळ एका विशेष सीरिज क्रमांकावरून येतील. म्हणजेच हे कॉल्स पाहिल्यावर कळेल की हे अर्जंट कॉल्स किंवा एसएमएस आहेत.

Web Title: no more unwanted spam calls from 1st may trai mandate new rules for telcos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.