Lokmat Money > बिझनेस न्यूज > दोन हजार रुपयांची नोट बंद होणार? वर्षभरात एकाही नव्या नोटेची छपाई नाही

दोन हजार रुपयांची नोट बंद होणार? वर्षभरात एकाही नव्या नोटेची छपाई नाही

गेल्या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांची एकही नोट छापली नसल्याचे रिझर्व्ह बँकेच्या अहवालामधून समोर आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 05:09 PM2020-08-25T17:09:53+5:302020-08-25T17:20:21+5:30

गेल्या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांची एकही नोट छापली नसल्याचे रिझर्व्ह बँकेच्या अहवालामधून समोर आले आहे.

No new notes will be printed during the year, two thousand rupee note will be closed? | दोन हजार रुपयांची नोट बंद होणार? वर्षभरात एकाही नव्या नोटेची छपाई नाही

दोन हजार रुपयांची नोट बंद होणार? वर्षभरात एकाही नव्या नोटेची छपाई नाही

Highlightsगेल्या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांची एकही नोट छापली नसल्याचे रिझर्व्ह बँकेच्या अहवालामधून समोर दोन हजार रुपयांच्या नोटांचे प्रमाण कमी होत असले तरी २०० आणि ५०० रुपयांच्या नोटांना असलेली मागणी वाढली गेल्या काही वर्षांत चलनामधील नव्या नोटांचे प्रमाण वाढले असले तरी बनावट नोटांचे प्रमाणही तितक्याच वेगाने वाढत आहे

मुंबई - २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयानंतर चलनात असलेल्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंद करून दोन हजार रुपयांची नोट चलनात आणली गेली होती. मात्र मात्र किरकोळ व्यवहारांसाठी ही नोट तेव्हापासून सर्वसामान्यांसाठी अडचणीची ठरत होती.दरम्यान, २०१९-२० या सरलेल्या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांची एकही नवी नोट छापलेली नाही. त्यामुळे आताही ही नोट चलनातून बाद होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांची एकही नोट छापली नसल्याचे रिझर्व्ह बँकेच्या अहवालामधून समोर आले आहे. गेल्या दोन वर्षांत ५ हजार ५१२ लाख पीस दोन हजार रुपयांच्या नोटांचे वितरण कमी झाले आहे. मूल्यात्मक विचार केल्यास २०१८ मध्ये एकूण नोटांच्या ३७.३ टक्के म्हणजेच सहा लाख ७२ हजार ६४२ कोटी रुपयांच्या मूल्याच्या २ हजार रुपयांच्या नोटा चलनात होत्या . मार्च २०२० मध्ये हे प्रमाण घटून पाच लाख ४७ हजार ९५२ कोटी रुपये एवढे झाले. म्हणजेच गेल्या दोन वर्षांमध्ये ११०,२४७ कोट रुपये मूल्याच्या दोन हजार रुपयांच्या नोटांचे सर्क्युलेशन कमी झाले आहे.

मात्र एकीकडे दोन हजार रुपयांच्या नोटांचे प्रमाण कमी होत असले तरी २०० आणि ५०० रुपयांच्या नोटांना असलेली मागणी वाढली आहे. २०१८ मध्ये ३७ हजार ०५३ कोटी रुपये मूल्याच्या २०० कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. हे प्रमाण मार्च २०२० पर्यंत १ लाख ०७ हजार २९३ कोटी रुपये मूल्यापर्यंत पोहोचले आहे.

दरम्यान, गेल्या काही वर्षांत चलनामधील नव्या नोटांचे प्रमाण वाढले असले तरी बनावट नोटांचे प्रमाणही तितक्याच वेगाने वाढत आहे. २०१९-२० या वर्षांमध्ये पकडण्यात आलेल्या बनावट नोटांपैकी ४.६ टक्के नोटाह्या आरबीआय स्तरावर तर ९५.४ टक्के नोटा अन्य बँकांच्या स्तरावर पकडल्या गेल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत १०, ५०, २०० आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण वाढले आहे. तर दोन हजारांच्या बनावट नोटांचे प्रमाम २१ हजार ८४७ वरून १७ हजार ०२० पर्यंत खाली आले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तयार झालंय खास एअर इंडिया वन विमान, अशी आहेत वैशिष्ट्ये

ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा

केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

Web Title: No new notes will be printed during the year, two thousand rupee note will be closed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.