Lokmat Money > बिझनेस न्यूज > हजाराची नोट नाहीच

हजाराची नोट नाहीच

एक हजार रुपयांची नवी नोट आणण्याची कोणतीही योजना नसल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने केले आहे

By admin | Published: February 23, 2017 12:56 AM2017-02-23T00:56:47+5:302017-02-23T00:56:47+5:30

एक हजार रुपयांची नवी नोट आणण्याची कोणतीही योजना नसल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने केले आहे

No notes of Hazare | हजाराची नोट नाहीच

हजाराची नोट नाहीच

नवी दिल्ली : एक हजार रुपयांची नवी नोट आणण्याची कोणतीही योजना नसल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने केले आहे. या उलट कमी मूल्याच्या नोटा छापण्यावर सरकार भर देणार आहे, तसेच एटीएममध्ये रोख रकमेच्या तुटवड्याकडे लक्ष देण्यात येत आहे, असेही सांगण्यात आले.
केंद्रीय वित्त सचिव शक्तिकांत दास यांनी टिष्ट्वट करून ही माहिती दिली. त्यांनी म्हटले की, एक हजार रुपयाची नोट आणण्याची
कोणतीही योजना सरकारसमोर  नाही. पाचशे आणि त्यापेक्षा कमी किमतीच्या नोटांची छपाई आणि पुरवठा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.
एक हजाराची नवी नोट चलनात आणण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याच्या बातम्या दोन दिवसांपासून प्रसारमाध्यमांकडून दिल्या जात आहेत. नोटांची छपाई सुरू झाली असून, फक्त तारीख निश्चित करणे बाकी आहे, असे या वृत्तांत म्हटले होते.
केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी गेल्या सप्ताहात सांगितले होते की, पाचशे आणि हजारांच्या बंद नोटांच्या जागी नव्या नोटा जारी करण्याचे काम आता जवळजवळ पूर्ण होत आले आहे. रिझर्व्ह बँक नोटांच्या स्थितीवर रोजच्या रोज नजर ठेवून आहे.
८ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यानंतर, दोन हजार आणि पाचशेच्या नव्या नोटा चलनात आणल्या होत्या. हजाराची नोट मात्र, अजून चलनात आणण्यात आली नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)

गरजेपुरत्याच नोटा एटीएममधून काढा
 अन्य एका टिष्ट्वटमध्ये दास यांनी म्हटले की, एटीएममधील रोख रक्कम संपत असल्याच्या तक्रारी येत असून, त्याकडे लक्ष दिले जात आहे.

लोकांना आमची विनंती आहे की, वास्तविक जेवढी गरज असेल, तेवढ्याच नोटा एटीएममधून काढाव्यात.
कोणी जास्तीच्या नोटा काढल्यास अन्य कोणी गरजू नोटांपासून वंचित राहू शकतो. सध्या आपल्याकडे पुरेसे चलन उपलब्ध आहे, पण आवश्यक तितकेच पैसे लोकांनी काढावेत, असे त्यांचे म्हणणे आहे.

५ लाखांपर्यंत ज्येष्ठांना सवलत
७0 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ५ लाखांपर्यंतच्या रकमेच्या भरण्यावर कोणत्याही चौकशीला सामोरे जावे लागणार नाही. त्यापेक्षा कमी वयाच्या नागरिकांना ही सवलत २.५ लाखांपर्यंतच असेल. २.५ लाखांपेक्षा जास्त रक्कम भरलेली असल्यास चौकशी केली जाईल, असे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे.

Web Title: No notes of Hazare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.