Join us  

नोटाबंदीमुळे मंदी! टीव्ही, फ्रिज, वॉशिंगमशीनच्या विक्रीत लक्षणीय घट

By admin | Published: December 30, 2016 8:31 PM

नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या चलन तुटवड्यामुळे लोकांनी काटकसरीस प्राधान्य दिल्याने टीव्ही, फ्रीज वॉ़शिंगमशीन अशा वस्तूंच्या विक्रीत

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 30 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे विविध क्षेत्रांना फटका बसला आहे. नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या चलन तुटवड्यामुळे लोकांनी काटकसरीस प्राधान्य दिल्याने टीव्ही, फ्रीज वॉ़शिंगमशीन अशा वस्तूंच्या विक्रीत लक्षणीय घट झाली आहे. प्रसिद्ध  झालेल्या आकडेवारीतून यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात टीव्ही, फ्रीज वॉ़शिंगमशीनच्या विक्रीत  गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 38 टक्के घट झाल्याचे समोर आले आहे.  
यंदाच्या दिवाळीत गृहोपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली होती. जवळपास 45 हजार कोटींची खरेदी झाली होती. त्यामुळे यंदाची ऑक्टोबर ते डिसेंबर ही तिमाही व्यवसायाच्या दृष्टीने सर्वोत्तम तिमाही ठरणार असा अंदाज होता, पण नोटाबंदीमुळे सर्व व्यवसायाचे गणित बिघडले. 
जीएफके - नेल्सनने केलेल्या सर्वेनुसार किरकोळ बाजारातील टीव्हीच्या विक्रीमध्ये 30.4 टक्क्यांनी घट झाली आहे. तर रेफ्रिजरेटरच्या विक्रीत 41.2 टक्के घट झाली आहे. त्याबरोबरच मायक्रोव्हेव ओव्हनची विक्री 53 टक्क्यांनी घटली आहे. याबाबतचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.