नवी दिल्ली : गगनाला भिडलेले पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी त्यावरील कर टक्क्यांऐवजी रुपयामध्ये आकारण्याचा केंद्र सरकार विचार करीत आहे. यामुळे इंधनाचे दर ३५ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतील. वित्त मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, पेट्रोल-डिझेलचे दर ६० ते ८० रुपयांच्या दरम्यान असल्यास त्यावर ८ ते १० रुपये कर लावला जाईल. हेच भाव ८० ते ९० रुपयांवर गेले तर या कराचा दर ५ ते ८ रुपये निश्चित केला जाईल. यामुळे इंधन दरात मोठा दिलासा मिळू शकेल.
तेल उत्पादन वाढणार!
तेल उत्पादक देशांची (ओपेक) बैठक बुधवारी रात्री उशीरा आॅस्ट्रियात झाली. ओपेक सदस्य उत्पादन वाढविण्याच्या विचारात असल्याने बुधवारी कच्च्या तेलाच्या दरात ३६ रुपये प्रति बॅरेल (१५९ लिटरचा एक बॅरल) घट झाली.
‘इंधनाचे दर तात्काळ कमी करण्यासाठी घाईघाईने कुठलाच निर्णय घेतला जाणार नाही. ठोस उपाययोजना सरकारकडून केली जात आहे.’
- रवीशंकर प्रसाद, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री
पेट्रोल-डिझेलवरील कर टक्क्यात नाही रुपयांत
हेच भाव ८० ते ९० रुपयांवर गेले तर या कराचा दर ५ ते ८ रुपये निश्चित केला जाईल.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:33 AM2018-05-24T00:33:14+5:302018-05-24T00:33:14+5:30