Lokmat Money > बिझनेस न्यूज > PAN Card हरवलं असलं तरी टेन्शन नाही; सहजरित्या डाऊनलोड करू शकता e-PAN, पाहा प्रोसेस

PAN Card हरवलं असलं तरी टेन्शन नाही; सहजरित्या डाऊनलोड करू शकता e-PAN, पाहा प्रोसेस

प्रत्येक आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. जर तुमचं पॅन कार्ड हरवलं असेल तर आता टेन्शन घेण्याची गरज नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 11:30 AM2023-12-07T11:30:51+5:302023-12-07T11:31:33+5:30

प्रत्येक आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. जर तुमचं पॅन कार्ड हरवलं असेल तर आता टेन्शन घेण्याची गरज नाही.

No tension even if PAN Card is lost You can easily download e PAN see the process step by step procedure | PAN Card हरवलं असलं तरी टेन्शन नाही; सहजरित्या डाऊनलोड करू शकता e-PAN, पाहा प्रोसेस

PAN Card हरवलं असलं तरी टेन्शन नाही; सहजरित्या डाऊनलोड करू शकता e-PAN, पाहा प्रोसेस

प्रत्येक आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. जर तुमचं पॅन कार्ड हरवलं असेल तर आता टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्ही आता डिजिटल पॅन कार्डही वापरू शकता आणि तुम्ही स्मार्टफोनमध्येही ते सेव्ह करू शकता. याला ई-पॅन असं म्हणतात. ते इन्कम टॅक्स, UTIITSL किंवा NSDL वेबसाइटवरून डाउनलोड केले जाऊ शकते. हे इलेक्ट्रॉनिक व्हर्जन आहे. ई-पॅन डाउनलोड करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. येथे आम्ही तुम्हाला ई-पॅन डाउनलोड करण्याचा सोपा मार्ग सांगत आहोत.

वेब साईटद्वारे डाऊनलोड करा
जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केला असेल, तर पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी आयकर ई-फायलिंग वेबसाइट ही योग्य जागा आहे.

स्टेप १ - सर्वप्रथम, तुम्हाला अधिकृत आयकर ई-फायलिंग वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
स्टेप २ - त्यानंतर डाव्या बाजूला दिसणाऱ्या Instant E-PAN वर क्लिक करा.
स्टेप ३: आता Check Status/ Download PAN च्या खाली दिलेल्या Continue वर क्लिक करा.
स्टेप ४: आता तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल. नंतर खाली दिलेल्या चेकबॉक्सवर मार्क करा आणि नंतर Continue वर क्लिक करा.
स्टेप ५: आता तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल.
स्टेप ६: आता OTP टाका आणि Continue वर क्लिक करा.
स्टेप ७: यानंतर दुसरी स्क्रीन दिसेल ज्यामध्ये View E-PAN आणि Download E-PAN हे पर्याय उपलब्ध असतील. यामधून Download E-PAN चा पर्याय निवडा.
स्टेप ८: नंतर Save the PDF file वर क्लिक करा. यानंतर तुमचं ई-पॅन डाउनलोड होईल. 

तुम्हाला ई-पॅन डाउनलोड करण्याचा पर्याय दिसत नसल्यास, तुम्हाला मागे जाऊन  Get New E-PAN चा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर दिलेली प्रोसेस फॉलो करा. याशिवाय, जर तुम्ही डाउनलोड केलेली PDF फाइल पासवर्ड प्रोटेक्टेड असेल, तर त्याचा पासवर्ज म्हणून तुमची जन्मतारीख DDMMYYYY फॉरमॅटमध्ये टाकावी लागेल.

Web Title: No tension even if PAN Card is lost You can easily download e PAN see the process step by step procedure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.