Join us

जॉब गेला तरी नो टेन्शन, विम्यामध्ये नाव करा मेन्शन!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 5:46 AM

नोकरी गेल्यानंतर ज्यांच्यावर कर्जाचे ओझे होते त्यांना बँकेचे ईएमआय कसे भरायचे, घरखर्च कसा चालवायचा, मुलांच्या शाळेची फी कशी भरायची, असे अनेक प्रश्न निर्माण झाले.

मुंबई : सध्याच्या वातावरणात नोकरी कधी जाईल याचा काही नेम नाही. कोरोनाच्या महामारीत जगभरात कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, तर अनेकांना कमी पगारात काम करावे लागले. नोकरी गेल्यानंतर ज्यांच्यावर कर्जाचे ओझे होते त्यांना बँकेचे ईएमआय कसे भरायचे, घरखर्च कसा चालवायचा, मुलांच्या शाळेची फी कशी भरायची, असे अनेक प्रश्न निर्माण झाले. मात्र आता तुमच्याकडे पुरेशी रक्कम गाठीशी नसेल तर यावेळी तुमच्या मदतीला नोकरी विमा (जॉब इन्शुरन्स) येऊ शकतो. अनेक विमा कंपन्यांनी जॉब विमा पॉलिसी देण्यास सुरुवात केली आहे.नोकरी विम्याची खास वैशिष्ट्येया पॉलिसीच्या अंतर्गत जर पॉलिसीधारकाची नोकरी गेली तर त्याला आणि त्याच्या कुटुंबास काही महिन्यांसाठी आर्थिक मदत करण्यात येते.मात्र, पॉलिसीधारकाने पॉलिसीमध्ये दिलेल्या कारणांमुळे त्याची नोकरी गमावली असेल तरच त्याला ही मदत देण्यात येते.काही गंभीर आजार किंवा अपघातामुळे, पूर्णपणे किंवा कायमचे अपंगत्व आल्यासही आर्थिक मदत मिळते.ही एक स्वतंत्र पॉलिसी नाही, त्यामुळे ही पॉलिसी वेगळी घेता येणार नाही. मुख्य पॉलिसीसह याचा समावेश करण्यात येतो.साधारणपणे तुम्ही आरोग्य विमा किंवा गृह विमा पॉलिसीसह ही पॉलिसी घेऊ शकता.कोण घेऊ शकते पॉलिसीअर्जदाराचे उत्पन्न पगाराच्या स्वरूपात असावेअर्जदार ज्या कंपनीत काम करत आहे ती नोंदणीकृत असावी.स्वतः काम करणारे ही पॉलिसी घेऊ शकत नाहीत.काय कव्हर होणारपॉलिसीमध्ये नमूद केलेल्या कारणांमुळे तुम्ही तुमची नोकरी गमावल्यास, तुम्हाला संरक्षण मिळेल. तात्पुरत्या निलंबनाच्या बाबतीतही कव्हर उपलब्ध आहे.असा करा अर्जपॉलिसीधारकाची नोकरी गेल्यास त्याला विमा कंपनीला कळवावे लागेल. पॉलिसीधारकाला नोकरी नसल्याचा पुरावाही द्यावा लागतो. यासोबतच इतर कागदपत्रेही द्यावी लागतील. सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर, विमा कंपनी दाव्याची रक्कम देते.क्लेम कधी मिळणार नाहीपॉलिसीधारकाने खराब काम, अप्रामाणिकपणा किंवा फसवणुकीमुळे त्याची नोकरी गमावली असल्यास.प्रोबेशन कालावधीत नोकरी गेली तर. स्वेच्छानिवृत्ती घेतली असल्यास. तात्पुरत्या करारावर काम करणाऱ्यांसाठी.