Airtel Prepaid, Postpaid Plan Launched: एअरटेलनं आपल्या ग्राहकांसाठी नवे प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन लॉन्च केले आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे एअरटेलच्या नव्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनमध्ये डिस्ने + हॉटस्टारचे (Disney+Hotstar) फ्री सब्सक्रिप्शन देण्यात येत आहे. आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२४ (ICC T20 World Cup 2024) डोळ्यासमोर ठेवून कंपनीने हे नवे प्लान्स लॉन्च केले आहेत. याशिवाय कंपनीनं आपल्या काही ब्रॉडबँड प्लानमध्ये ओटीटी बेनिफिट्सही दिले आहेत.
डिस्ने+हॉटस्टारसोबत एअरटेलचे प्रीपेड प्लॅन
एअरटेलच्या नव्या ४९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज ३ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलही मिळतात. म्हणजेच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल्स मिळतात. या प्लानमध्ये डिस्ने+ हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन ३ महिन्यांसाठी मोफत दिलं जातंय. याशिवाय ग्राहकांना एअरटेल एक्सट्रीमचा फ्री अॅक्सेस देखील मिळतो, ज्यामध्ये सोनी लिव्हसारख्या २० हून अधिक ओटीटी सेवा मोफत मिळतात. या प्लानची वैधता एकूण २८ दिवसांची आहे.
८९९ रुपयांचा प्रीपेड प्लान
या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये ग्राहक अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलचा फायदा घेऊ शकतात. एअरटेलच्या या नव्या प्लानमध्ये डिस्ने + हॉटस्टार सब्सक्रिप्शन ३ महिन्यांसाठी फ्री मिळत आहे. याशिवाय एअरटेल एक्सट्रीमचा वापर कोणतेही अतिरिक्त पैसे न भरता करता करता येणार आहे.
एअरटेलचा वार्षिक प्लान कोणता?
एअरटेलच्या ३,३५९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची वैधता ३६५ दिवसांची आहे. या प्लानमध्ये दररोज २.५ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये ग्राहक अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलचा फायदा घेऊ शकतात. याशिवाय या पॅकमध्ये दररोज १०० एसएमएसही मिळतात. ओटीटी बेनिफिट्सबद्दल बोलायचं झालं तर या वार्षिक रिचार्ज पॅकमध्ये ग्राहकांना १ वर्षासाठी डिस्ने + हॉटस्टारचं फ्री सब्सक्रिप्शन मिळतं. या पॅकमध्ये ग्राहक एअरटेल एक्सट्रीमचा मोफत लाभ घेऊ शकतात.
पोस्टपेड प्लॅन
एअरटेलच्या १४९९ रुपयांच्या प्लानमध्ये ४ अॅड-ऑन सिमकार्ड मिळतात. या प्लानमध्ये २०० जीबीपर्यंत इंटरनेट डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये १ वर्षासाठी मोबाइल डिस्ने+हॉटस्टार मिळतो. याशिवाय अनलिमिटेड एक्सट्रीम प्लेची ही सुविधा आहे. ११९९ रुपयांच्या प्लानमध्ये ३ अॅड-ऑन आणि १५० जीबी डेटा दिला जातो. ९९९ रुपयांच्या प्लानमध्ये कंपनी ३ अॅड-ऑन सिमकार्ड आणि १०० जीबी डेटा देत आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये ग्राहकांना एक्सट्रीम प्लेची अनलिमिटेड सर्व्हिस दिली जात आहे.
५९९ रुपयांच्या प्लानमध्ये १ अॅड-ऑन सिमकार्डसोबत ७५ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये एक्सट्रीम प्ले चा ३ महिन्यांसाठी अॅक्सेस दिला जातो. तर ४९९ रुपये आणि ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना अनुक्रमे ७५ जीबी आणि ४० जीबी डेटा ऑफर केला जात आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये एक्सट्रीम प्लेचा लाभ ३ महिन्यांसाठी घेता येणार आहे.