Lokmat Money > बिझनेस न्यूज > नोटाबंदीचा निर्णय धाडसी - बिल गेट्स

नोटाबंदीचा निर्णय धाडसी - बिल गेट्स

५०० व १ हजार रुपयांच्या नोटा बाद करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय धाडसी आहे, असे उद्गार काढत मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी निर्णयाचे स्वागत केले आहे.

By admin | Published: November 18, 2016 01:46 AM2016-11-18T01:46:12+5:302016-11-18T03:33:06+5:30

५०० व १ हजार रुपयांच्या नोटा बाद करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय धाडसी आहे, असे उद्गार काढत मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी निर्णयाचे स्वागत केले आहे.

Nodal decision is shocking - Bill Gates | नोटाबंदीचा निर्णय धाडसी - बिल गेट्स

नोटाबंदीचा निर्णय धाडसी - बिल गेट्स

नवी दिल्ली : चलनातून ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा बाद करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय धाडसी आहे, असे उद्गार काढत मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी निर्णयाचे स्वागत केले आहे. हे पाऊल म्हणजे भारताला काळ्या अर्थव्यवस्थेकडून पारदर्शक अर्थव्यवस्थेकडे घेऊन जाणारा महत्त्वपूर्ण निर्णय आहे असे प्रशस्तीपत्रही गेट्स यांनी दिले.
दिल्लीत निती आयोगातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या व्याख्यानमालेत मार्गदर्शन करताना गेट्स यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले. ते म्हणाले की, पाचशे आणि एक हजारच्या जुन्या नोटा रद्द करुन नव्या नोटा बाजारात आणण्याचा मोदींचा निर्णय धाडसी आहे. नव्या नोटा तयार करताना चोख सुरक्षा उपाययोजना केल्यामुळे अर्थव्यवस्था अधिक पारदर्शक होईल.
त्यांनी जीएसटीच्या निर्णयाचेही स्वागत केले. मात्र ही तर केवळ सुरुवात असून आणखी बरीच सुधारणा करायची आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले होते. स्वच्छ भारत, स्टार्टअप इंडिया आणि आधार कार्ड मोहीमेचेही त्यांनी कौतुक केले. ये है मेरे मन की बात आहे, असे सांगत मिश्कील शब्दांत ज्यांनी भाषणाचा समारोप केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Nodal decision is shocking - Bill Gates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.