Join us  

उगाच नाही नोएल टाटा झाले ग्रुपचे अध्यक्ष! आतापर्यंतचं काम आहे थक्क करणारं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 5:32 PM

Tata Trusts: टाटा ट्रस्ट ही देशातील सर्वात मोठी सेवाभावी संस्था आहे. टाटा ट्रस्टमध्ये सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट अशी दोन ट्रस्ट आहेत. टाटा सन्समध्ये त्यांची जवळपास ५२ टक्के भागीदारी आहे.

Tata Trusts : उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर टाटा समूहाचा उत्तराधिकारी कोण? असा प्रश्न उपस्थित झाला होता. यात अनेक नाव चर्चेत आली होती. अखेर रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा (Noel Tata) यांची टाटा ट्रस्टचे पुढील अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. यापूर्वी टाटा सन्सच्या नव्या प्रमुखाची निवड होत असताना त्यांचे नाव चर्चेत आलं होतं. मात्र, त्यावेळी टाटा सन्सची जबाबदारी सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्याकडे गेली. यावेळी नवल टाटा आणि सिमोन टाटा यांचे पुत्र नोएल टाटा यांना अखेर हा मान मिळाला.

नोएल टाटा यांच्या खांद्यावर टाटा समूहाची जबाबदारी अनेक अर्थांनी योग्य असल्याचे त्यांच्या कारकीर्दीवरुन लक्षात येईल.

  • अध्यक्ष होण्यापूर्वी ते टाटा इंटरनॅशनल लिमिटेडच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. चार दशकांत त्यांनी टाटा समूहात अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
  • ट्रेंट, व्होल्टास आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचेही ते अध्यक्ष आहेत. तर टाटा स्टील आणि टायटन कंपनीचे उपाध्यक्ष पदाचीही जबाबदारी सांभाळतात. 
  • याव्यतिरिक्त सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत.
  • त्यांच्या नेतृत्वाखाली, ऑगस्ट २०१० ते नोव्हेंबर २०२१ दरम्यान, टाटा इंटरनॅशनल ५०० दशलक्ष ते ३ अब्ज डॉलर किमतीची कंपनी बनली आहे.
  • याशिवाय त्यांनी ट्रेंटचे १९९८ मध्ये १ स्टोअर असलेल्या कंपनीतून ७०० स्टोअर्स असलेल्या कंपनीत रूपांतर केले आहे.

टाटा ट्रस्टटाटा ट्रस्ट ही देशातील सर्वात मोठी सेवाभावी संस्था आहे. या व्यतिरिक्त, हा १६५ अब्ज डॉलर्सचा टाटा समूहाचा सर्वात मोठा भागधारक आहे. रतन टाटा यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून कोणाचीही निवड केली नव्हती, त्यामुळे टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष निवडण्याची जबाबदारी त्यांच्या मंडळावर आली होती. टाटा ट्रस्टमध्ये सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट अशी आणखी २ ट्रस्ट आहेत. टाटा सन्समध्ये त्यांची जवळपास ५२ टक्के भागीदारी आहे. टाटा सन्सकडे टाटा समूहाची मालकी आहे, ज्यांचा व्यवसाय मिठापासून एअरलाइन्सपर्यंत आहे.

पारशी समाजाला आनंद मिळेल टाटा ट्रस्टची जबाबदारी नोएल टाटा यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय पारशी समाजालाही खूश करणारा आहे. ज्या कुटुंबाने टाटा समूह तयार केला तो टाटा ट्रस्टचा प्रभारी आहे. आतापर्यंत त्याची कमान फक्त पारशी कुटुंबांकडे होती.

यापूर्वी जावयाला दिली होती संधीनोएल टाटा हे सर दोराबजी टाटा ट्रस्टचे ११ वे आणि सर रतन टाटा ट्रस्टचे ६ वे अध्यक्ष असतील. गेल्या वेळी त्यांना खूश करण्यासाठी रतन टाटा यांनी त्यांच्या जागी त्यांचे जावई सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सची कमान दिली होती. पण, रतन टाटा त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. त्यांनी त्यांना हटवून एन चंद्रशेखरन यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली होती.

टॅग्स :नोएल टाटाटाटारतन टाटा