Join us

Noel Tata : रतन टाटांचा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 2:36 PM

Who is Noel Tata : रतन टाटांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टची धुरा कोणाच्या हाती जाणार? हा महत्त्वाचा प्रश्न होता. परंतु आता टाटा ट्रस्टची कमान कोण सांभाळणार आहेत हे स्पष्ट झालंय.

Noel Tata : रतन टाटांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टची धुरा कोणाच्या हाती जाणार? हा महत्त्वाचा प्रश्न होता. परंतु आता टाटा ट्रस्टची कमान कोण सांभाळणार आहेत हे स्पष्ट झालंय. नोएल टाटा टाटा हे टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष असतील, त्यांची अध्यक्षपदी एकमतानं निवड करण्यात आल्याची माहिती समोर आलीये. मुंबईत टाटा ट्रस्टच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सध्या नोएल टाटा हे सर दोराबजींचे विश्वस्त आहेत. परंतु आता टाटा समूहाची जबाबदारी आता नोएल टाटा यांच्या खांद्यावर आली आहे. नोएल टाटा हे नवल टाटा आणि समोन टाटा यांचे सुपुत्र आहेत.

रतन टाटा यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोएल टाटा यांच्याशी बोलून शोक व्यक्त केला होता. नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदासाठी ते एक प्रमुख दावेदार मानले जात होते. रतन टाटा यांच्यानंतर आता नोएल टाटा ट्रस्टच्या अतर्गत असलेल्या कंपन्या चालवणार आहेत. 

टाटा सन्स समूहाची मूळ कंपनी

नोएल टाटा सध्या सर दोराबजी टाटा ट्रस्ट (Sir Dorabji Tata Trust) आणि सर रतन टाटा ट्रस्टचे (Ratan Tata Trust) विश्वस्त आहेत. टाटा सन्समध्ये या दोन्ही ट्रस्टचा मिळून ६६ टक्के हिस्सा आहे. टाटा सन्स ही टाटा समूहाची मूळ कंपनी आहे. नोएल टाटा यांच्या निवडीचा निर्णय हा समूहासाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण त्यात एविशएश पासून ऑटोमोबाईल इंडस्ट्रीच्या पोर्टफोलिओचा समावेश आहे.

कसा होता त्यांचा प्रवास?

नोएल टाटा गेल्या ४० वर्षांपासून टाटा समूहाचा भाग आहेत. सध्या ते टाटा समूहातील अनेक कंपन्यांचे संचालक मंडळाचे सदस्य आहेत. ते टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, व्होल्टास आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आहेत. टाटा स्टील अँड टायटन कंपनी लिमिटेडमध्ये ते उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. नोएल टाटा ऑगस्ट २०१० ते नोव्हेंबर २०२१ दरम्यान ट्रेंटचे व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली ट्रेंटची उलाढाल ५०० मिलियन डॉलर्सवरून वाढून ३ बिलियन डॉलरवर गेली. नोएल टाटा यांनी ससेक्स विद्यापीठातून पदवी घेतली आहे.  

यापूर्वी नोएल टाटा यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. परंतु नंतर हे पद सायरस मिस्त्री यांना देण्यात आलं. मिस्त्री यांच्या राजीनाम्यानंतर एन. चंद्रशेखरन यांनी या पदाची जबाबदारी स्वीकारली. 

टॅग्स :रतन टाटाटाटानोएल टाटा