एकेकाळी जगप्रसिद्ध मोबाईल ब्रँड राहिलेल्या नोकिया कंपनीने आपल्या लोगोत बदल केला आहे. तब्बल ६० वर्षांपासून नोकियाचा एकच लोगो होता. मात्र, कंपनीने आता ५ वेगवेगळ्या डिझाईन वापरुन हा लोगो बनवला आहे. नवीन लोगोसह मार्केटमध्ये पुन्हा कमबॅक करण्याचे संकेतच कंपनीने दिले आहेत. रंगीत आणि वेगवेगळ्या ५ डिझाईन एकत्र करुन NOKIA हा शब्द लोगो बनून तयार झाला आहे. यापूर्वीचा लोगो केवळ निळ्या व पांढऱ्या रंगात अतिशय साधारण होता.
कंपनीने नवीन लोगो लाँच केल्यानंतर कंपनीचे सीईओ Pekka Lundmark नी दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, कंपनीची प्राथमिकता आता केवळ स्मार्टफोन्स नाही. आता, आम्ही बिझनेस टेक्नॉलॉजी कंपनी बनले आहोत. नोकिया आता वेगवेगळ्या बिझनेस आणि टेक्नॉलॉजीत विस्तार करणार असल्याचं सीईओंनीं म्हटले. ज्यामध्ये, गुंतवणूक हाही बिझनेस असणार आहे.
नोकिया कंपनीने काही दिवसांपूर्वीच Nokia G22 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या मोबाईल फोनचे बॅक कव्हर १०० टक्के रिसायकल्ड प्लॅस्टीकपासून बनविण्यात आले आहे. Nokia G22 ची बॅटरी, डिस्प्ले, चार्जिंग पोर्ट या प्रत्येक गोष्टीला ग्राहक घरीच ठीक करु शकतात. त्यासाठी, मोबाईल फोनसोबत कंपनीकडून i Fixit किटही देण्यात येते. या किटद्वारे आपण मोबाईल फोनमधील कुठलाही पार्ट सहजपणे बदलू शकतात.
नोकिया कंपनीचा Nokia 11 हा फोन जगातील सर्वाधिक विक्री झालेला फोन ठरला आहे. या फोनचे जगभरात २५० मिलियन्स म्हणजेच २५ कोटी युनिट्स विक्री करण्यात आले होते. कंपनीने २००३ मध्ये Nokia 11 हा फोन लाँच केला होता. सहज वापरता येणारा आणि टिकायला दमदार असल्याने या फोनची सहजच विक्री झाली होती.