Join us

नोटाबंदीचा सूक्ष्म वित्त कंपन्यांना मोठा फटका

By admin | Published: April 19, 2017 2:09 AM

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या नोटाबंदीचा जबर फटका सूक्ष्म वित्त संस्थांना (मायक्रो फायनान्स कंपन्या) बसला आहे

कोलकाता : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या नोटाबंदीचा जबर फटका सूक्ष्म वित्त संस्थांना (मायक्रो फायनान्स कंपन्या) बसला आहे. या वित्त वर्ष १७च्या दुसऱ्या सहामाहीत सूक्ष्म कर्जांचे रोखे रुपांतरण (सेक्युरीटायझेशन) तब्बल ७९ टक्क्यांनी घटले आहे.इक्राचे रचनात्मक वित्त विभागाचे प्रमुख विभोर मित्तल यांनी सांगितले की, वित्त वर्ष २0१७च्या दुसऱ्या सहामाहीत रोखे रूपांतरणाचे प्रमाण ७९ टक्क्यांनी घसरून १,६५0 कोटींवर आले. आदल्या वर्षी याच काळात ८ हजार कोटींचे रोखे रूपांतरण झाले होते.नोव्हेंबर २0१६मध्ये सरकारने नोटाबंदीचा धाडसी निर्णय घेतला होता. इक्राने केलेल्या ताज्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, सूक्ष्म कर्जांचे रोखे रूपांतरण गेल्या दोन वर्षांपासून जबरदस्त वृद्धी दर्शवित होते. (वृत्तसंस्था)