वॉशिंग्टन : नोटाबंदीमुळे भारतामध्ये रोख रकमेची गंभीर समस्या निर्माण झाली असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी स्पष्टपणे म्हटले आहे. या टंचाईचा मागणीवर विपरित परिणाम झाला आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. नोटाबंदीने चलनातील रोख रक्कम व्हॅक्यूम क्लिनर प्रमाणे शोषून घेतली आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
नाणेनिधीचे आशिया-प्रशांत विभागाचे सहायक संचालक पॉल ए. कॅशीन यांनी सांगितले की, आपण हेलिकॉप्टरने पैसे टाकण्याच्या बिगर पारंपरिक धोरणाबद्दल ऐकले असेल. या पार्श्वभूमीवर नोटाबंदीची तुलना व्हॅक्यूम क्लिनरशी करता येऊ शकते. व्हॅक्युम क्लीनर जसे सारे काही खेचून वा शोषून घेते, तसेच रोख रकमेच्या बाबतीत भारतामध्ये घडले. नाणेनिधीने भारतावर वार्षिक अहवाल जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर कॅशीन यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, भारताच्या नोटाबंदीच्या निर्णयाने व्हॅक्यूम क्लिनरने रोख पूर्ण शोषून घेतली. आता व्हॅक्यूम क्लिनर उलटे चालवून नोटा चलनात टाकण्याचे काम सुरू झाले आहे. तथापि, त्याची गती फारच कमी आहे. त्यामुळे देशात रोखीचे संकट निर्माण झाले. सरकारने नव्या नोटा चलनात टाकण्याचे काम गतीने करायला हवे. गरज पडल्यास ग्रामीण भागांत तसेच दूरवर्ती भागांत जुन्या नोटांच्या वापराची परवानगी द्यायला हवी.
नोटाबंदीने रोख रक्कम शोषून घेतली
नोटाबंदीमुळे भारतामध्ये रोख रकमेची गंभीर समस्या निर्माण झाली असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी स्पष्टपणे म्हटले आहे. या टंचाईचा मागणीवर विपरित परिणाम झाला आहे
By admin | Published: February 25, 2017 12:52 AM2017-02-25T00:52:24+5:302017-02-25T00:54:36+5:30