Join us  

नोटाबंदी ही ‘विध्वंसक नवनिर्मिती’

By admin | Published: January 06, 2017 1:57 AM

नोटाबंदी हा १९९१ नंतरच्या काळातील उलथापालथ करण्याची क्षमता असलेला सर्वांत मोठा निर्णय असून, ही एक ‘विध्वसंक नवनिर्मिती’ आहे

हैदराबाद : नोटाबंदी हा १९९१ नंतरच्या काळातील उलथापालथ करण्याची क्षमता असलेला सर्वांत मोठा निर्णय असून, ही एक ‘विध्वसंक नवनिर्मिती’ आहे, अशा शब्दांत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाबद्दल मत व्यक्त केले. या निर्णयामुळे काळा पैसा नष्ट होण्यास मदत होणार आहे, असेही ते म्हणाले. बँकिंग तंत्रज्ञान विकास आणि संशोधन संस्थेने आयोजित केलेल्या परिषदेत बोलताना सुब्बाराव यांनी सांगितले की, मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी एका झटक्यात चलनातील ८६ टक्के नोटा बाद करून टाकल्या. त्यामुळेच हा १९९१ नंतरचा सर्वांत मोठा धक्का देणारा निर्णय आहे.ते म्हणाले की, नोटाबंदीच्या अंमलबजावणीवर झालेला खर्च व त्याचे लाभ हा वादाचा विषय आहे. तथापि, धोरणात्मक नवनिर्मितीच्या मुद्द्यावर कोणताही वाद नाही. या निर्णयाने पेमेंट यंत्रणेत उलथापालथ झाली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)