Lokmat Money > बिझनेस न्यूज > Northern Arc Capital IPO पहिल्याच दिवशी ओव्हरसबस्क्राईब, ग्रे मार्केटमध्ये शेअर रॉकेट; एक्सपर्ट म्हणाले...

Northern Arc Capital IPO पहिल्याच दिवशी ओव्हरसबस्क्राईब, ग्रे मार्केटमध्ये शेअर रॉकेट; एक्सपर्ट म्हणाले...

Northern Arc Capital IPO: लोन वितरण कंपनी नॉर्दन आर्क कॅपिटलच्या आयपीओला किरकोळ गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पाहा आयपीओचे डिटेल्स.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 01:59 PM2024-09-16T13:59:54+5:302024-09-16T14:00:13+5:30

Northern Arc Capital IPO: लोन वितरण कंपनी नॉर्दन आर्क कॅपिटलच्या आयपीओला किरकोळ गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पाहा आयपीओचे डिटेल्स.

Northern Arc Capital IPO oversubscribed on first day shares rocket in gray market Experts buy rating | Northern Arc Capital IPO पहिल्याच दिवशी ओव्हरसबस्क्राईब, ग्रे मार्केटमध्ये शेअर रॉकेट; एक्सपर्ट म्हणाले...

Northern Arc Capital IPO पहिल्याच दिवशी ओव्हरसबस्क्राईब, ग्रे मार्केटमध्ये शेअर रॉकेट; एक्सपर्ट म्हणाले...

Northern Arc Capital IPO: लोन वितरण कंपनी नॉर्दन आर्क कॅपिटलच्या आयपीओला किरकोळ गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेला भाग ओव्हरसब्सक्राइब झाला. एकूण ७७७ कोटी रुपयांचा इश्यूही ओव्हरसबस्क्राइब झाला आहे. आता ग्रे मार्केटबद्दल बोलायचं झालं तर कंपनीचे शेअर्स आयपीओच्या अपर प्राइस बँडपासून १५८ रुपये म्हणजेच ६०.०८ टक्के जीएमपीवर (ग्रे मार्केट प्रीमियम) व्यवहार करत आहेत. परंतु ग्रे मार्केटच्या संकेतांऐवजी आयपीओमधील गुंतवणुकीशी संबंधित निर्णय कंपनीच्या व्यावसायिक हेल्थनुसार घ्यावे, असं बाजार तज्ज्ञांचं मत आहे.

किती झाला सबस्क्राइब?

क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्स (क्यूआयबी) - ०.०० पट
नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्स  (एनआयआई) - १.१८ पट
किरकोळ गुंतवणूकदार - १.५५ पट
कर्मचाऱ्यांचा कोटा : ०.४१ पट
एकूण- १.०२ पट
(स्रोत : बीएसई, १६ सप्टेंबर २०२४)

काय म्हणताहेत एक्सपर्ट?

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म एसबीआय सिक्युरिटीजनं याला लाँग टर्म सबस्क्राइब रेटिंग दिलं आहे. आणखी एक ब्रोकरेज कंपनी स्टॉक्सबॉक्सने या आयपीओला सबस्क्राइब रेटिंग दिलं आहे. ब्रोकरेजला त्याची किंमत योग्य दिसत आहे. 

आयपीओचे डिटेल्स

नॉर्दर्न आर्क कॅपिटलच्या ७७७ कोटी रुपयांच्या आयपीओसाठी २४९ ते २६३ रुपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आलाय. याच्या एका लॉटमध्ये ५७ शेअर्स आहेत. कर्मचाऱ्यांना प्रत्येक शेअरवर २४ रुपयांची सूट मिळणार आहे. हा इश्यू आज, १६ सप्टेंबर रोजी खुला होत असून १९ सप्टेंबरपर्यंत खुला राहणार आहे. आयपीओ अंतर्गत शेअर्सचं वाटप २० सप्टेंबर रोजी अंतिम केलं जाईल. त्यानंतर शेअर २४ सप्टेंबरला बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होतील. 

या इश्यूचे रजिस्ट्रार केफिन टेक आहेत. या आयपीओअंतर्गत ५०० कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी केले जातील. याशिवाय ऑफर फॉर सेल विंडो अंतर्गत १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूचे १,०५,३२,३२० शेअर्स विकले जाणार आहेत. ऑफर फॉर सेलचे पैसे शेअर्स विकणाऱ्या भागधारकांना दिले जातील. त्याचबरोबर नव्या शेअर्सच्या माध्यमातून जमा होणारा पैसा कर्ज वाटपाच्या भांडवली गरजांमध्ये वापरला जाणार आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. यातील तज्ज्ञांची मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Northern Arc Capital IPO oversubscribed on first day shares rocket in gray market Experts buy rating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.