Lokmat Money > बिझनेस न्यूज > नोटाबंदी, जीएसटीमुळे वाढेल महसूल

नोटाबंदी, जीएसटीमुळे वाढेल महसूल

केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी नोटाबंदीचे जोरदार समर्थन ेकले. या निर्णयाने काही काळासाठी सगळ््या व्यवस्थेला झटका

By admin | Published: January 28, 2017 12:48 AM2017-01-28T00:48:37+5:302017-01-28T04:42:22+5:30

केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी नोटाबंदीचे जोरदार समर्थन ेकले. या निर्णयाने काही काळासाठी सगळ््या व्यवस्थेला झटका

Nostalgia, increase revenue due to GST | नोटाबंदी, जीएसटीमुळे वाढेल महसूल

नोटाबंदी, जीएसटीमुळे वाढेल महसूल

विशाखापट्टणम : केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी नोटाबंदीचे जोरदार समर्थन ेकले. या निर्णयाने काही काळासाठी सगळ््या व्यवस्थेला झटका दिला आहे, पण यातून अंतिमत: सरकारला लाभच होईल, असे ते म्हणाले. वस्तू व सेवा कराचाही (जीएसटी) महसूल वाढीस उपयोग होईल, असे त्यांनी बोलून दाखविले.
जीएसीटीशी संबंधित सर्व वादग्रस्त मुद्यांवर तोडगा काढण्यात आला आहे. अप्रत्यक्ष कराची ही नवी व्यवस्था आता अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात आहे, असा दावाही अरुण जेटली यांनी केला.
भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) वतीने आयोजित करण्यात आलेल्या भागिदारी शिखर परिषदेत बोलताना जेटली म्हणाले की, नोटाबंदी आणि जीएसटी यामुळे येणाऱ्या काळात अधिक महसूल मिळेल. त्याचबरोबर औपचारिक अर्थव्यवस्थेचा त्यामुळे विस्तार होईल. सामान्यत: आपला समाज कर नियमांचे पालन न करणारा आहे. केंद्र आणि राज्य सरकारांना आपली संसाधने उभी करताना संघर्ष करावा लागतो.
करचोरी करणारांना त्यात अनुचित लाभ मिळतो. जेवढी कर चोरी वाढते, तेवढा कर भरणाऱ्यांवर अधिक बोजा वाढतो, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने मोठ्या रकमेच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही काळासाठी प्रणालीला झटका बसला, हे खरे आहे. तथापि, अवैध, समांतर आणि अनौपचारिक पातळीवर होणारे आर्थिक
व्यवसाय त्यामुळे हळूहळू संपतील. हा व्यवसाय औपचारिक अर्थव्यवस्थेला जोडला जाईल, असेही अर्थमंत्री म्हणाले. (वृत्तसंस्था)

Web Title: Nostalgia, increase revenue due to GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.