Lokmat Money > बिझनेस न्यूज > दिल्ली, मुंबई नाही 'या' राज्यातील लोक घेतात सर्वात जास्त कर्ज; जाणून घ्या सविस्तर

दिल्ली, मुंबई नाही 'या' राज्यातील लोक घेतात सर्वात जास्त कर्ज; जाणून घ्या सविस्तर

सणासुदीच्या काळात बाजारात मागणी वाढू लागली आहे, देशात मोठ्या शहरांच्या तुलनेत छोट्या शहरात कर्जाची मागणी वाढली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 05:49 PM2023-10-26T17:49:13+5:302023-10-26T17:50:02+5:30

सणासुदीच्या काळात बाजारात मागणी वाढू लागली आहे, देशात मोठ्या शहरांच्या तुलनेत छोट्या शहरात कर्जाची मागणी वाढली आहे.

Not Delhi, Mumbai, 'these' states borrow the most; Know in detail | दिल्ली, मुंबई नाही 'या' राज्यातील लोक घेतात सर्वात जास्त कर्ज; जाणून घ्या सविस्तर

दिल्ली, मुंबई नाही 'या' राज्यातील लोक घेतात सर्वात जास्त कर्ज; जाणून घ्या सविस्तर

देशभरात कर्जाची मागणी झपाट्याने वाढत आहे. सणासुदीच्या काळात प्रत्येकजण खरेदीत व्यस्त असतो. एका अहवालानुसार, सणासुदीच्या काळात कर्जाच्या मागणीत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. एका अहवालानुसार, सणासुदीच्या हंगामामुळे देशातील व्यवसाय कर्जाची मागणी ७३% वाढली आहे.

Apple चा मोठा धमाका! 31 ऑक्टोबरला लॉन्च होणार अनेक गॅजेट्स; जाणून घ्या डिटेल्स...

सणासुदीच्या काळात मेट्रो शहरांपेक्षा बिगर मेट्रो शहरांमध्ये मागणी वेगाने वाढली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीत, बिगर मेट्रो शहरांमध्ये मागणी ७४% आणि मेट्रो शहरांमध्ये ६९% वाढली आहे. २३ सप्टेंबर दरम्यान या मागणीत गैर-मेट्रो शहरांमध्ये ५८% आणि मेट्रो शहरांमध्ये ५२% वाढ झाली.

दिल्ली आणि मुंबईसारख्या मेट्रो शहरांच्या तुलनेत, या तिमाहीत बिगर मेट्रो शहरांमध्ये व्यवसाय कर्जाच्या मागणीत ७४% वाढ झाली आहे. फक्त सप्टेंबर महिन्यात, बिगर मेट्रो शहरांमध्ये व्यवसाय कर्जाच्या मागणीत ५८% वाढ दिसून आली आहे. टॉप-१० नॉन-मेट्रो शहरांमध्ये व्यवसाय कर्जाच्या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे.

स्वयंरोजगार आणि एमएसएमई क्षेत्रांना अनेकदा कर्ज मिळण्यात अडचणी येतात. पण वाढत्या डिजिटायझेशनसह, डिजिटल सार्वजनिक वस्तूंच्या पायाभूत सुविधा आणि क्रेडिट ब्युरो, आधार, GST आणि खाते एकत्रित करणाऱ्यांद्वारे समर्थित नवीन डेटा इकोसिस्टमच्या आगमनाने, कर्ज उद्योगाचा विस्तार होण्याची अपेक्षा आहे, यामुळे MSME सारख्या विभागांपर्यंत पोहोचेल.

ज्या क्षेत्रांमध्ये व्यवसायासाठी कर्ज घेण्याची मागणी वाढत आहे. त्यात रिटेल क्षेत्र आघाडीवर आहे. व्यापार, सेवा आणि उत्पादन क्षेत्रातही मागणी वाढली आहे. सणासुदीमुळे बाजारपेठेत मागणी वाढली आहे.

व्यवसाय कर्ज मागणी वार्षिक वाढ (%)

सप्टेंबर २०२३

दिल्ली एनसीआर- 39, मुंबई-५४, हैदराबाद-
४६, बेंगळुरू- ५२, कोलकाता-११४, पुणे-३३, अहमदाबाद-४८, चेन्नई- ९५


बिगर मेट्रो शहरांमध्ये व्यवसाय कर्ज मागणी दर (%)


पटना- ७४, मुज्ज़फरपुर-५९, गोरखपुर-६०, करीमनगर-५५, अनंतपुर-६७, कुरुक्षेत्र-५५, बुलंदशहर-५७, खम्मम-५७, सागर-४८, नलगोंडा-४५.

Web Title: Not Delhi, Mumbai, 'these' states borrow the most; Know in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक