Join us  

देशात नव्हे, परदेशात जास्त कमाई; स्थलांतरितांचे उत्पन्न १२० टक्क्यांनी वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 10:25 AM

स्थलांतरितांना १२० टक्के उत्पन्न वाढीचा लाभ, ‘डब्ल्यूडीआर’च्या अहवालातील माहिती

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : माणूस पाेटाची खळगी भरण्यासाठी एका ठिकाणावरून दुसरीकडे जाताे. काही जण देशात, तर काही परदेशात जातात. जास्त फायदा काेणाचा, असा प्रश्न उपस्थित हाेताे. तर, परदेशात जाणाऱ्या भारतीयांना जास्त उत्पन्न मिळेल. अशा लाेकांचे उत्पन्न १२० टक्के, तर देशांतर्गत स्थलांतर करणाऱ्यांना ४० टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज ‘वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपाेर्ट’मधून (डब्ल्यूडीआर) वर्तविण्यात आला आहे.

एखाद्या ठिकाणच्या गरजेनुसार काैशल्य असलेल्या बहुसंख्य कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या माेबदल्यात स्थलांतरामुळे माेठी वाढ हाेते. ही वाढ परदेशात गेल्यास जास्त असते. मूळ ठिकाणीच थांबलेल्यांना या प्रमाणात माेबदला मिळण्यासाठी अनेक दशके प्रतीक्षा करावी लागू शकते. हे फायदे कुटुंब तसेच समुदायासाेबत वाटले जातात, अर्थात मायदेशी असलेल्या आप्तेष्टांना परदेशातील लाेक माेठ्या प्रमाणावर पैसे पाठवतात. 

मायदेशी पैसे पाठविण्याचे प्रमाण वाढलेn भारत, मेक्सिकाे, चीन आणि फिलिपाइन्स यांसारख्या देशांमध्ये स्थलांतरितांकडून मायदेशी पैसे पाठविण्याचे प्रमाण वाढल्याचे अहवालात म्हटले आहे. n युएईमधील कर्मचारी उत्पन्नापैकी ७० टक्के पैसे मायदेशी पाठविताे. 

कमाई वाढते, पण किंमतही माेजावी लागतेn स्थलांतर केल्यामुळे आर्थिक फायदा हाेताे. मात्र, त्यासाठी तेवढीच किंमतही माेजावी लागते. n आखाती देशात जाणाऱ्याला त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी साधारणत: दाेन महिन्यांचा पगार खर्च करावा लागताे. प्रत्येक देशानुसार हा खर्च कमी जास्त हाेताे. 

यांना मिळताे जास्त लाभसिलिकाॅन व्हॅलीत जाणारे उच्च काैशल्य असलेले आयटी क्षेत्रातील कर्मचारी किंवा डाॅक्टर्स यांनाही भरघाेस पगार मिळण्याची संधी आहे. याशिवाय वय, भाषेचे ज्ञान आणि कुठे स्थलांतर करणार आहात, यावरही लाभाचे प्रमाण ठरते.

...असे हाेते स्थलांतर

अमेरिकेत जाणाऱ्यांना सर्वाधिक फायदाअमेरिकेत जाणाऱ्या कमी काैशल्य असलेल्या भारतीयांना सर्वाधिक फायदा हाेईल. या श्रेणीतील लाेकांना तब्बल ५०० टक्के जास्त वेतन मिळू शकते. 

त्यानंतर संयुक्त अरब अमिरातीमध्ये ३०० टक्के जास्त पगार मिळू शकताे. साैदी अरब, बहरिन, ओमान, कतार, कुवैत या देशांमध्ये जाणाऱ्यांना तुलनेने कमी लाभ आहे.

टॅग्स :नोकरीभारतअमेरिका