Lokmat Money > बिझनेस न्यूज > Unclaimed Money: केवळ बँकाच नाही, LIC कडेही २१,५०० कोटी पडून? तुमचे तर नाहीत ना? कसा कराल क्लेम

Unclaimed Money: केवळ बँकाच नाही, LIC कडेही २१,५०० कोटी पडून? तुमचे तर नाहीत ना? कसा कराल क्लेम

आयपीओदरम्यान सादर केलेल्या कागदपत्रांनुसार लोकांचे सुमारे २१,५०० कोटी रुपये सरकारी विमा कंपनी LIC कडे अनक्लेम्ड आहेत. पाहा परत कसे मिळवता येतील?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 03:06 PM2023-04-08T15:06:03+5:302023-04-08T15:06:56+5:30

आयपीओदरम्यान सादर केलेल्या कागदपत्रांनुसार लोकांचे सुमारे २१,५०० कोटी रुपये सरकारी विमा कंपनी LIC कडे अनक्लेम्ड आहेत. पाहा परत कसे मिळवता येतील?

not just banks Unclaimed Money 21500 crore lying with LIC How to claim know step by step procedure | Unclaimed Money: केवळ बँकाच नाही, LIC कडेही २१,५०० कोटी पडून? तुमचे तर नाहीत ना? कसा कराल क्लेम

Unclaimed Money: केवळ बँकाच नाही, LIC कडेही २१,५०० कोटी पडून? तुमचे तर नाहीत ना? कसा कराल क्लेम

भारतीय रिझर्व्ह बँकेनं देशातील १२ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील सुमारे ३५,००० कोटी रुपयांचे वारस शोधण्यासाठी एक नवीन सेंट्रलाईज्ड पोर्टल तयार करण्याची घोषणा केली आहे. कदाचित दोन ते चार महिन्यांत हे पोर्टलही लाइव्ह होईल. मात्र सरकारी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळही (LIC)या बाबतीत मागे नाही. एलआयसीकडेही जवळपास २१,५०० कोटी रुपये आहेत, ज्यांच्यावर अद्याप कोणीही दावा केलेला नाही.

एलआयसीच्या सध्याच्या दावा न केलेल्या रकमेबाबत कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. परंतु जेव्हा कंपनीने आपला आयपीओ लाँच केला तेव्हा त्यांनी कागदपत्रांमध्ये यासंदर्भातील माहिती दिली होती. सप्टेंबर २०२१ पर्यंत २१,५३९ कोटी रुपये अनक्लेम्ड असल्याचं सांगण्यात आलं होतं. जर यापैकी तुमची तर पॉलिसी अनक्लेम्ड नाही ना हे जाणून घ्यायचं असेल तर याची पूर्ण प्रोसेस आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

अशी करून घ्या माहिती
दावा न केलेली रक्कम शोधण्यासाठी एलआयसीनं आपल्या पोर्टलवर एक विशेष टूल दिलं आहे. येथे तुम्ही तुमच्या पॉलिसीचे तपशील सांगून दावा न केलेली रक्कम शोधू शकता. पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर.

  • सर्वप्रथम एलआयसीच्या साईटवर जा.
  • त्यानंतर तुम्हाला कस्टमर सर्व्हिस सेक्शनमध्ये जावं लागेल.
  • याठिकाणी तुम्हाला ‘Unclaimed Amount of Policyholders’ वर क्लिक करावं लागेल.
  • त्यानंतर एक विंडो ओपन होईल, त्या ठिकामी तुम्हाला पॉलिसीशी निगडीत माहिती टाकावी लागेल.
  • त्यानंतर सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अनक्लेम्ड अमाऊंटची डिटेल येईल.


केवायसीनंतर करू शकता क्लेम 
केवायसी नियमांचं पालन करून तुम्ही एलआयसीमध्ये दावा न केलेल्या रकमेवर दावा करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचे योग्य KYC करून घ्यावे लागेल, तसेच पॉलिसीधारकाचे KYC देखील अपडेट करावे लागेल. याशिवाय तुम्हाला पॉलिसीशी संबंधित कागदपत्रेही सादर करावी लागतील. एलआयसीकडून जारी केलेली ही रक्कम पॉलिसीधारकाच्या खात्यात जमा केली जाईल.

Web Title: not just banks Unclaimed Money 21500 crore lying with LIC How to claim know step by step procedure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.