Lokmat Money > बिझनेस न्यूज > नाबाद ९९ - बी.के. बिर्ला जगातील सर्वांत ‘तरुण’ उद्योगपती!

नाबाद ९९ - बी.के. बिर्ला जगातील सर्वांत ‘तरुण’ उद्योगपती!

८५ वर्षांवरील १३ उद्योगप्रमुखांमध्ये ८ भारतीय. शनिवारी ९९ व्या वर्षात पदार्पण करणारे बसंतकुमार बिर्ला हे जगातील सर्वांत ‘तरुण’ उद्योगपती म्हणावे लागतील. याही वयात ते अधूनमधून बी.के. बिर्ला समूहाच्या कार्यालयात हजेरी लावत असतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 06:21 AM2019-01-13T06:21:23+5:302019-01-13T06:21:36+5:30

८५ वर्षांवरील १३ उद्योगप्रमुखांमध्ये ८ भारतीय. शनिवारी ९९ व्या वर्षात पदार्पण करणारे बसंतकुमार बिर्ला हे जगातील सर्वांत ‘तरुण’ उद्योगपती म्हणावे लागतील. याही वयात ते अधूनमधून बी.के. बिर्ला समूहाच्या कार्यालयात हजेरी लावत असतात.

Not Out 99 - BK Birla is the world's youngest businessman! | नाबाद ९९ - बी.के. बिर्ला जगातील सर्वांत ‘तरुण’ उद्योगपती!

नाबाद ९९ - बी.के. बिर्ला जगातील सर्वांत ‘तरुण’ उद्योगपती!

मुंबई : बसंतकुमार बिर्लांचा जन्म १२ जानेवारी १९२१ रोजी कोलकात्यात झाला. सुप्रसिद्ध उद्योगपती घनशामदास बिर्ला यांचे ते कनिष्ठ चिरंजीव व विदर्भवीर ब्रिजलाल बियाणी यांचे जामात. कै. सरलादेवी या त्यांच्या पत्नी. बसंतकुमार बिर्ला यांनी १५ व्या वर्षी व्यवसाय सुरू केला व वस्त्रोद्योग, सिमेंट, टायर, रिफॅक्टरीज, कागद, स्पन पाईप, चहा, कॉफी, प्लायवूड इत्यादी क्षेत्रात कंपन्या व १० अब्ज डॉलर्स संपत्ती मूल्य असलेला बी.के. बिर्ला उद्योगसमूह उभा केला.


सरलादेवींच्या मृत्यूनंतर २०१५ साली बसंतकुमार बिर्ला यांनी आपल्या १० कंपन्या नातू कुमारमंगलम बिर्ला, मुली मंजुश्री खेतान, जयश्री मोहता व नात विदुला जालान यांच्या सुपुर्द करून व्यवसाय-निवृत्ती स्वीकारली. उद्योग विश्वात ‘बीकेबाबू’ अशी ओळख असलेले बिर्ला अद्यापही अधूनमधून समूहाच्या कंपन्यांच्या कार्यालयात भेटी देत असतात.


अमेरिकेत वर्क-यूएस या संस्थेने तयार केलेल्या यादीनुसार जगात ८५ वर्षापेक्षा अधिक वयाचे व एक अब्ज डॉलर्स संपत्तीमूल्य असलेले १३ उद्योगप्रमुख आहेत आणि विशेष म्हणजे त्यापैकी तब्बल आठ उद्योगप्रमुख भारतीय आहेत. ही बाब उद्योगजगताला प्रेरणा देणारी आहे.
बी.के. बिर्लानंतर महाशियान दिहट्टी (एमडीएच) मसाल्यांचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचा नंबर लागतो. ते ९६ वर्षांचे आहेत व आजही एमडीएच मसाल्यांच्या जाहिरातीत टीव्हीवर येत असतात.


तिसऱ्या क्रमांकावर जपानचे नोबुत्सुगू शिमिझू (९१) आहेत. ते सोलर पॅनेल्स बनवणाºया लाइफ कॉर्पोरेशनचे प्रमुख आहेत. चौथ्या क्रमांकावर शिनतारो त्सुजी (९०) आहेत. फिल्म निर्मिती व वितरण करणाºया हॅलो किट्टी कॉर्पोरेशनचे ते अध्यक्ष आहेत.
पाचव्या क्रमांकावर शापूरजी पल्लनजी मिस्त्री समूहाचे पल्लनजी मिस्त्री (९०) आहेत. शापूरजी पल्लनजी समूह टाटा सन्स या टाटा समूहाचा सर्वांत मोठा भागधारक आहे. पल्लनजी मिस्त्री यांचे संपत्तीमूल्य १७ अब्ज डॉलर्स आहे. यानंतर श्री सिमेंटस् समूहाच्या बेणूगोपाल बांगुर यांचा नंबर लागतो. त्यांचे संपत्ती मूल्य ४ अब्ज डॉलर्स आहे.


भारताला लॅक्मे हा पहिला सौंदर्य प्रसाधनांचा ब्रॅन्ड देणाºया सिमोन टाटा (८९) या सातव्या क्रमांकावर आहेत. मूळच्या स्विस असलेल्या सिमोन टाटा या टाटा उद्योग समूहाचे आधारस्तंभ कै. नवल टाटा यांच्या पत्नी आहेत. त्या सध्या वेस्टसाईड स्टोअर्सच्या अध्यक्षा आहेत.
हाँगकाँगच्या इचिसन टेलिकॉमचे ली का-शिंग (८९) आठव्या क्रमांकावर आहेत. त्यांचे एकूण संपत्तीमूल्य ३८ अब्ज डॉलर्स आहे. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती म्हणून गाजलेले वॉरेन बफे (८७) हे नवव्या क्रमांकावर आहेत. एक धोरणी व मुत्सद्दी शेअर मार्केट गुंतवणूकदार म्हणून ते जगभरच्या चाहत्यांमध्ये कमालीचे लोकप्रिय आहेत. बर्कशायर हाथवे नावाच्या कंपनीचे ते अध्यक्ष आहेत. संपत्ती मूल्य ८७ अब्ज डॉलर्स. यानंतर दिल्लीच्या डीएलएफचे अध्यक्ष कुशलपाल सिंग (८७) हे बलाढ्य बांधकाम व्यवसायी येतात. त्यांचे संपत्तीमूल्य ६ अब्ज डॉलर्स आहे.


कोलकात्याच्या विल्यमसन मेगोर समूहाचे ब्रिजमोहन खेतान (८७) हे आहेत. एव्हरेडी, एक्साईड बॅटरी व चहा मळ्यांचा त्यांचा व्यवसाय आहे. संपत्ती मूल्य ४ अब्ज डॉलर्स.
जगभर माध्यम सम्राट म्हणून प्रसिद्ध असलेले आॅस्ट्रेलियाचे रुपर्ट मर्डोक (८६) हे १२व्या स्थानावर आहेत. न्यूज कॉर्प या कंपनीचे ते अध्यक्ष असून संपत्ती मूल्य १९ अब्ज डॉलर्स आहे.
१३व्या क्रमांकावर मुंबईच्या युनायटेड फॉस्फोरस लिमिटेडचे (यूपीएल) अध्यक्ष व प्रबंध संचालक रजनीकांत श्रॉफ हे आहेत. ते ८५ वर्षांचे आहेत व १०० हून अधिक देशांत त्यांचा व्यवसाय पसरला आहे. त्यांचे संपत्ती मूल्य ४ अब्ज डॉलर्स आहे.

Web Title: Not Out 99 - BK Birla is the world's youngest businessman!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.