लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ट्विटरने भारतात ब्लू टीकसाठी सशुल्क सेवा लाँच केली हाेती. त्यानंतर दाेन दिवसांपूर्वी ब्लू सबस्क्रिप्शन न घेतलेल्या सर्वांच्या नावासमाेरची ब्लू टीक हटविण्यात आली हाेती. त्यात काँग्रेस नेते राहुल गांधी, महेंद्रसिंह धाेनी, सलमान खान, शाहरुख खान आदींसह अनेक दिग्गजांचा समावेश हाेता. मात्र, आता त्यांचे १० लाखांहून अधिक फाॅलोअर्स आहेत, अशांना ब्लू टीक पुन्हा बहाल करण्यात आली आहे.
ब्लू टीक परत बहाल हाेण्यामागे काही तांत्रिक चूक तर नाही ना, याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झाले नाही. जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, मी सबस्क्रिप्शनसाठी पैसे दिलेले नाहीत. मात्र, माझे ब्लू टीक परत मिळाले आहे.
यांचे ब्लू टीक परत मिळाले
सचिन तेंडुलकर, विराट काेहली, उमर अब्दुल्ला, राहुल गांधी, महेंद्रसिंह धाेनी, सलमान खान, शाहरुख खान आदी.