Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘टेस्ला’ नव्हे, तर ‘ही’ चिनी कंपनी भारतात करणार ‘ईव्ही’चे उत्पादन

‘टेस्ला’ नव्हे, तर ‘ही’ चिनी कंपनी भारतात करणार ‘ईव्ही’चे उत्पादन

८ हजार काेटी गुंतविणार, राेजगारही देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 05:34 AM2023-07-15T05:34:07+5:302023-07-15T05:34:50+5:30

८ हजार काेटी गुंतविणार, राेजगारही देणार

Not 'Tesla', but 'BYD' Chinese company will produce 'EV' in India | ‘टेस्ला’ नव्हे, तर ‘ही’ चिनी कंपनी भारतात करणार ‘ईव्ही’चे उत्पादन

‘टेस्ला’ नव्हे, तर ‘ही’ चिनी कंपनी भारतात करणार ‘ईव्ही’चे उत्पादन

नवी दिल्ली -  टेस्ला नव्हे तर ‘बीवायडी’ ही चीनमधील इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी भारतात प्रवेश करणार आहे. कंपनीने भारतात उत्पादन आणि विक्रीसाठी परवानगी मागितली आहे. कंपनी भारतात सुमारे ८ हजार २०० काेटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

‘बीवायडी’ने हैदराबाद येथील मेघा इंजिनिअरिंग ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीसाेबत भागीदारी केली आहे. कंपनीच्या सहयाेगाने इलेक्ट्रिक कार व बॅटरी उत्पादनासाठी परवानगी मागितली आहे. कंपनी तेलंगणामध्ये कारखाना उभारणार आहे. यासाठी १५० एकर जमीन यापूर्वीच संपादित  केलेली आहे.  ‘बीवायडी’चा प्रकल्प मंजूर झाल्यास आणखी जमिनीची मागणी करण्यात येईल.

या गाड्या आणणार
‘बीवायडी’ हॅचबॅकपासून लक्झरी कारची संपूर्ण श्रेणी भारतात लाॅंच करण्याची शक्यता आहे. कंपनीने अद्याप याबाबत काेणतीही टिप्पणी केलेली नाही. 

Web Title: Not 'Tesla', but 'BYD' Chinese company will produce 'EV' in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.