दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याची अफवा उठली होती. त्यामुळे काही ठिकाणी ग्राहक व दुकानदारांनी घेण्यास नकार दिल्याचे दिसून आले. अफवेमुळे नागरिकांना त्रास झाला.
बँकांकडे नाणीच नाणी - हॉटेल, भाजी विक्रेते यांच्याकडे नाणी अक्षरशः पोती भरून आहेत. ही नाणी स्वीकारण्याबाबत बँकांमध्ये जाताना दिसून आले. अफवांमुळे अनेक दुकानांत दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार देण्यात येत होता. याशिवाय किरकोळ विक्रेते, भाजी विक्रेत्यांमध्ये संभ्रमावस्था होती.
दहा रुपयांचे नाणे चलनात असून दहा रुपयांचे नाणे बंद झाले असे कोणतेही अधिकृत पत्र अथवा सरकारी आदेश नाही. दोन आठवड्यांपूर्वी या अफवेने जोर पकडला होता. आता मात्र ती अफवा थंडावली आहे. त्यामुळे दहा रुपयांचे नाणे घेणे व देणे सुरू झाले आहे. सध्या दहा रुपयांच्या नव्या नोटांची छपाई बंद असल्याने व्यवहारात सर्व जुन्या नोटा वापरात असल्याचे दिसून येते.त्यामुळे दहा रुपयांचे नाणे बंद होत असल्याची अफवा बाजारात पसरली होती. ग्राहकांना नाणे देण्यात आले की काही ठिकाणी वाद झाल्याची उदाहरणे आहेत.
दोन हजारांची नोट एटीएममध्ये येणे बंद झाली. त्यामुळे कित्येकांना पुन्हा नोटही पाहायला मिळालेली नाही. अजूनही व्यवहारात या नोटा फारशा दिसत नाहीत. धान्य विकत घ्यायला गेलो असता मिळाली.- गिरीश गायकवाड, ग्राहक
नोटा बंद झाल्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर दोन हजारांची नोट घरी सापडली होती. आता पुन्हा नोटा चलनात आल्याने ती नोट वापरली गेली. सामान्य नागरिकांकडे दोन हजारांच्या नोटा राहतील, असे दिवस कुठे आहेत - अमोल काळे, ग्राहक
दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याची अफवा पसरल्याने घरी काही प्रमाणात जमा केलेल्या नाण्यांचे करायचे काय, याचे टेंशन आले होते. मात्र, अधिकृत काहीही निर्णय जाहीर न झाल्याने हायसे वाटले. - संजय मोरे, भाजी विक्रेता