नवी दिल्ली : काेराेना महामारीच्या प्रभावातून भारतीयअर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, आर्थिक धाेरणात खूप बदल केल्यास राेखे बाजारावर विपरीत परिणाम हाेऊ शकताे, अशी भीती रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केली आहे. सध्याच्या धाेरणांद्वारे महगाई राेखण्यामध्ये तसेच विकासदर वाढीस मदत हाेत असल्याचेही निरीक्षण राजन यांनी नाेंदविले. (This is not the time to change the economic landscape says Raghuram Rajan)
राजन यांनी सांगितले, की वर्ष २०२४-२५ पर्यंत भारताचीअर्थव्यवस्था ५ हजार अब्ज डाॅलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य अतिमहत्त्वाकांक्षी आहे. काेराेना महामारीपूर्वीदेखील याबाबत सावधगिरी बाळगून आकडेमाेड केलेली नाही. ते म्हणाले, आर्थिक धाेरणांमुळे महागाईवर नियंत्रण ठेवण्यास मदत झाली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आरबीआयला देखील संधी मिळाली आहे. ही व्यवस्था नसती तर एवढा माेठी वित्तीय तूट सहन करणे खूप कठीण गेले असते. ही व्यवस्था बदलल्यास राेखे बाजारावर माेठा परिणाम हाेण्याचा धाेका आहे. त्यामुळे त्यासाठी ही याेग्य वेळ नसल्याचे राजन म्हणाले.महागाईचा दर चार टक्क्यांपर्यंत नियंत्रणात ठेवण्याचे लक्ष्य आरबीआयला दिले हाेते. हे लक्ष्य २०१६ मध्ये पाच वर्षांसाठी ठरिवण्यात आले हाेते. त्यामुळे पुढील पाच वर्षांसाठीचा दर या महिन्यात ठरविण्यात येण्याची शक्यता आहे.
खासगीकरणाचा रेकाॅर्ड वर-खालीआर्थिक सुधारणांबाबत राजन यांनी सांगितले, की यंदाच्या अर्थसंकल्पात खासगीकरणावर अधिक जाेर देण्यात आला आहे. याबाबत सरकारचा रेकाॅर्ड वर-खाली राहिलेला आहे. यंदादेखील परिस्थिती वेगळी कशी राहील, याबाबत राजन यांनी आश्चर्य व्यक्त केले. यावेळी अर्थसंकल्पात खर्च आणि उत्पन्नाबाबत बऱ्याच प्रमाणात पारदर्शकता दिसत असल्याचेही राजन म्हणाले.