आयकर भरण्याची वाढीव मुदत पुढील चार दिवसांत संपणार आहे. जर आयकर भरला नसेल तर येत्या तीन दिवसांत भरावा लागेल अन्यथा 5 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. सरकारने आयकर भरण्याची 2017-18 या वर्षाची मुदत 31 जुलैवरून एक महिना वाढवून 31 ऑगस्ट केली होती. चला आयकर कसा भरावा याची माहिती घेऊयात...
योग्य फॉर्मची निवड
आयकर भरण्याची पहिली चूक ही चुकीचा फॉर्म भरण्यावरून सुरु होते. तुम्ही ऑनलाईन आयकर भरत नसला तर पहिले काम म्हणजे योग्य फॉर्म निवडणे. यानंतर फॉर्म 16 च्या मदतीने तुम्ही आयकर भरू शकता. परंतू फॉर्म 16 नसेल तर काय?
घाबरून जाऊ नका... फॉर्म 16 नसला तरीही तुम्ही आयकर भरू शकता. कर मोजणीची काही सुत्रे लक्षात घेऊन फॉर्म 16 शिवायही आयकर भरता येतो. तर चला जाणून घेऊया कोणता आयटीआर फॉर्म कुठुन डाऊनलोड करायचा...
कोणता फॉर्म कोणासाठी ?
- आईटीआर-1 : हा फॉर्म सामान्य व्यक्तीसाठी आहे. जो भारतीय नागरिक आहे आणि ज्याचे वेतन, घरभाडे आणि बँकेत जमा असलेल्या रक्कमेवरील व्याज यावर आयकर ठरतो. या फॉर्मचा वापर आपण तेव्हा करू शकतो जेव्हा आपले उत्पन्न 50 लाखांपर्यंत असेल.
- आईटीआर-2 : हा फॉर्म सामान्य व्यक्ती आणि हिंदू एकत्रित कुटुंबातील सदस्यासाठी आहे. या व्यक्तीचे उत्पन्न व्यवसायातून नसावे.
- आईटीआर-3 : हिंदू एकत्रित कुटुंबातील सदस्यासाठी हा फॉर्म आहे. ज्याचे उत्पन्न व्यवसायातून असेल.
- आईटीआर- 4 सुगमः व्यवसायातून होणारे उत्पन्नावर कर भरण्यासाठी या फॉर्मचा वापर करावा.
- आयटीआर-5 : वरील चार नियमांमध्ये न बसणाऱ्या व्यक्ती, संस्थांनी हा फॉर्म भरावा.
- आईटीआर- 6 : आयकर कायद्यातील 11 व्या तरतुदीनुसार टॅक्समध्ये सूट मिळण्याचा दावा करणाऱ्या कंपन्यांव्यतिरिक्त असलेल्या कंपन्या हा फॉर्म भरू शकतात.
आईटीआर- 7 : आयकर कायदा सेक्शन 139(4A), 139(4B), 139(4C), 139(4D), 139(4E), 139(4F) अंतर्गत आयकर भरणारा व्यक्ती किंवा कंपनी हा फॉर्म भरतात.
हे फॉर्म कुठे मिळतात...
हे सर्व फॉर्म आयकर विभागाच्या वेबसाईटवर हिंदी आणि इंग्रजी माध्यमांत उपलब्ध आहेत.