ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच 2 हजार रुपयांची नोट चलनात आणणार आहे, असं वृत्त इंटरनॅशनल बिझनेस टाइम्सनं दिलं आहे. काळा पैशाला आळा घालण्यासाठीच रिझर्व्ह बँकेकडून हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं जात असल्याचं एका रिपोर्टमधून समोर आलं आहे.
म्हैसूरमधल्या चलन छपाई कारखान्यातील मशिनमधून या सर्व नोटा छापण्यात येणार आहेत. देशातील सर्व मोठ्या उद्योगसमूहांना सुरुवातीच्या काळात या नोटा चलन म्हणून वापरात आणण्यासाठी पाठवण्यात येणार आहेत. मात्र या वृत्ताला केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडून अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
अर्थ मंत्रालय आणि सुरक्षा प्रींटिंग इंडिया लिमिटेड कॉर्पोरेशन (एसपीएमसीआईएल) यांच्या मालकीच्या कंपनीच्या विभागातून या नोटा छापण्यात येणार आहेत. मध्य प्रदेशमधील देवास आणि महाराष्ट्रातील नाशिकमध्ये 40 टक्के नोटा छापल्या जाणार आहेत. तर उर्वरित नोटा मुंबई, हैदराबाद, कोलकाता आणि नोएडाच्या छपाई कारखान्यात छापण्यात येणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 2014-15 या आर्थिक वर्षात 500 आणि 1000च्या जवळपास 86 टक्के नवीन नोटा छापून चलनात आणल्या आहेत. त्यामुळे आता नव्या नोटांची अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
चलनात लवकरच येणार 2 हजारांची नोट ?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच 2 हजार रुपयांची नोट चलनात आणणार आहे, असं वृत्त इंटरनॅशनल बिझनेस टाइम्सनं दिलं आहे.
By admin | Published: October 24, 2016 06:18 PM2016-10-24T18:18:03+5:302016-10-24T18:18:03+5:30