नळ जोडणीधारकांकडून १ लाख ६६ हजारांची वसुली ४७ जणांना बजावल्या नोटीस
By admin | Published: September 29, 2014 9:46 PM
अकोला : अवैध नळ जोडणी शोध मोहिमेदरम्यान मनपाकडे ३२ जणांनी १ लाख ६६ हजारांचा भरणा केला. या व्यतिरिक्त जलप्रदाय विभागाने ४७ अवैध नळ जोडणीधारकांना नोटीस जारी करीत नळ जोडणी वैध करण्यासह दंडाची रक्कम जमा करण्याचे निर्देश सोमवारी दिले.
अकोला : अवैध नळ जोडणी शोध मोहिमेदरम्यान मनपाकडे ३२ जणांनी १ लाख ६६ हजारांचा भरणा केला. या व्यतिरिक्त जलप्रदाय विभागाने ४७ अवैध नळ जोडणीधारकांना नोटीस जारी करीत नळ जोडणी वैध करण्यासह दंडाची रक्कम जमा करण्याचे निर्देश सोमवारी दिले.मनपाकडे अधिकृत पाणीपी जमा न करता, पाण्याची चोरी करणार्या अवैध नळ जोडणीधारकांविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात येत आहे. जलप्रदाय विभागाच्या शोध मोहिमेत पाणी चोरी करणार्यांमध्ये चक्क डॉक्टर, उद्योजक, व्यावसायिक आदी उच्चभ्रू व्यक्तींचा समावेश आहे. यादरम्यान, ३२ अवैध नळ जोडणीधारकांकडून १ लाख ६६ हजार २१८ रुपये दंडापोटी वसूल करण्यात आले. तसेच ४७ जणांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मनपाच्या अभय योजनेंतर्गत नळ जोडणी वैध करून घेण्याचे आवाहन जलप्रदाय विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.