नवी दिल्ली : काही कारणास्तव आयकर भरण्यास विलंब झालेल्या करदात्यांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. आयकर विभागाचे अधिकारी काळ््या पैशाचा प्रश्न सोडवण्यासाठी व्यापक प्रमाणावर दंडात्मक तरतुदींचा आधार घेत आहेत. गेल्या काही महिन्यांत अशा अनेक नोटिसा दिल्या गेल्याचे समोर आले आहे.
माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीला मिळालेल्या उत्तरानुसार २०१८ मध्ये अशा नोटिसा हजारो करदात्यांना दिल्या गेल्या आहेत. एवढेच काय वेतनदारांनाही आयकर रिटर्न्स न भरणे किंवा कर भरण्यास उशीर केल्याबद्दल नोटिसा दिल्या गेल्या आहेत, असे आॅल इंडिया फेडरेशन आॅफ टॅक्स प्रॅ्रक्टिशनर्सचे माजी अध्यक्ष व वरिष्ठ वकील के. शिवराम यांनी सांगितले.
आयकर कायद्याचे कलम २७८ बी सह कलम २७६ बी अंतर्गत तुमच्यावर खटला का भरू नये याचा खुलासा करावा. कपात करून घेतलेला कर सरकारकडे भरला गेला नाही तर या कलमान्वये जास्तीतजास्त सात वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा होते, असे या नोटिसांमध्ये सूचित करण्यात आलेले आहे.
नियमभंगासाठी हजारो करदात्यांना मिळताहेत नोटिसा
काही कारणास्तव आयकर भरण्यास विलंब झालेल्या करदात्यांना नोटिसा बजावण्यात येत आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 02:35 AM2019-01-21T02:35:50+5:302019-01-21T02:35:56+5:30