Lokmat Money > बिझनेस न्यूज > २५ शहरांतील ६00 सराफा व्यापाऱ्यांना नोटिसा

२५ शहरांतील ६00 सराफा व्यापाऱ्यांना नोटिसा

उत्पादन शुल्क विभागाने देशातील २५ प्रमुख शहरांतील ६00पेक्षा अधिक सराफा व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या असून, सोने व मौल्यवान खड्यांच्या विक्रीचा तपशील मागितला आहे.

By admin | Published: November 12, 2016 01:54 AM2016-11-12T01:54:06+5:302016-11-12T01:54:06+5:30

उत्पादन शुल्क विभागाने देशातील २५ प्रमुख शहरांतील ६00पेक्षा अधिक सराफा व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या असून, सोने व मौल्यवान खड्यांच्या विक्रीचा तपशील मागितला आहे.

Notices for more than 600 jewelery traders in 25 cities | २५ शहरांतील ६00 सराफा व्यापाऱ्यांना नोटिसा

२५ शहरांतील ६00 सराफा व्यापाऱ्यांना नोटिसा

नवी दिल्ली : उत्पादन शुल्क विभागाने देशातील २५ प्रमुख शहरांतील ६00पेक्षा अधिक सराफा व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या असून, सोने व मौल्यवान खड्यांच्या विक्रीचा तपशील मागितला आहे.
सरकारने हजार-पाचशेच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर सोन्याच्या विक्रीत अचानक वाढ झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर सराफा व्यापाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. वित्त मंत्रालयाच्या कक्षेत काम करणाऱ्या केंद्रीय उत्पादन शुल्क माहिती महासंचालनालयाने सराफा व्यापाऱ्यांना या नोटिसा बजावल्या आहेत. ७ नोव्हेंबरनंतरच्या चार दिवसांत विक्री झालेल्या सोन्याचा तपशील त्यांच्याकडे मागण्यात आला आहे. सोन्याचा उपलब्ध साठा आणि विक्री अशी दोन्हींची माहिती देण्याचे निर्देश व्यापाऱ्यांना देण्यात आले आहेत.
दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, बंगळुरू, हैदराबाद, भोपाळ, विजयवाडा, नासिक, लखनौ अशा शहरांतील व्यापाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Notices for more than 600 jewelery traders in 25 cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.