नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे प्रत्येक क्षेत्रात टेक्नॉलॉजीचा (तंत्रज्ञान) वापर सतत वाढत आहे. ऑनलाईन शिक्षण, ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन मार्केट वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत नॉट ऑन मॅप (NotOnMap) आणि कॅलिफोर्नियास्थित हॉस्पिटॅलिटी फर्म स्टेफ्लेक्सीने डिजिटल प्लॅटफॉर्म नॉट ऑन मार्ट (NotOnMart) लाँच केले आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देशातील २० लाख शेतकरी आणि कारागीर थेट ग्राहकांशी जोडले जातील.
नॉट ऑन मार्टच्या माध्यमातून शेतकरी आणि कारागीरांचे उत्पन्न वाढेल. तसेच, चांगल्या प्रतीची उत्पादने थेट ग्राहकांना वाजवी किंमतीत उपलब्ध होतील. नॉट ऑन मार्ट २०२२ च्या पहिल्या तिमाहीत हे लक्ष्य प्राप्त करण्याच्या योजनेवर काम करत आहे. दरम्यान, नॉट ऑन मॅपची सुरुवात २०१४ मध्ये झाली. ही कंपनी पर्यटकांना ऑफबीट लोकेशनवर घेऊन जाते. त्याठिकाणी स्थानिक ग्रामस्थांच्या घरी त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली जाते. यामुळे पर्यटक आणि होस्ट कुटुंब यांच्यात सांस्कृतिक देवाण-घेवाण होते.
हिमाचल प्रदेश, लडाख, राजस्थान, केरळ, गोवा, आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा ८० ठिकाणी डिजिटल प्लॅटफॉर्म नॉट ऑन मॅप सेवा पुरविते. नॉट ऑन मार्ट हा लघुउद्योगाच्या दिशेने उचललेले पाऊल आहे. अगदी लहान आकाराच्या व्यवसायांमध्ये समन्वय साधण्याचे उद्दिष्ट आहे, असे नॉट ऑन मॅपचे संस्थापक आणि संचालक कुमार अनुभव यांनी सांगितले.
याचबरोबर, आमचे संपूर्ण लक्ष देशातील ग्रामीण भागातील शेतकरी आणि कारागिरांची ओखळ करण्यावर असणार आहे. ज्यांना शहरी बाजारपेठांपर्यंत पोहोचून ग्राहकांपर्यंत आपली उत्पादने उपलब्ध करून देण्यात मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागते, असे कुमार अनुभव म्हणाले.
ग्रामीण भागातील लोक मध्यस्थी आणि वितरकांवर अवलंबून आहेत. आमचा हेतू आहे की पुरवठा साखळी यंत्रणा लहान करणे आणि त्यांना मध्यस्थींच्या जाळ्यापासून मुक्त करून थेट ग्राहकांशी जोडणे. सध्या ४००० लोक नॉट ऑन मार्टशी जोडलेले आहेत. २०२२ च्या पहिल्या तिमाहीपर्यंत यामध्ये २० लाख शेतकरी आणि कारागीर सामील होतील, अशी आशा कुमार अनुभव यांनी व्यक्त केली आहे.
नॉट ऑन मार्टने हिमाचल, उत्तराखंड, राजस्थान आणि केरळसह देशातील ११ राज्यांना प्लॅटफॉर्मला जोडण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सध्याच्या बर्याच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपासून वेगळे असलेले नॉट ऑन मार्ट ग्राहकांना कोणते उत्पादन बनविणार्या शेतकरी किंवा कारागीरांशी कसा संपर्क साधावा, याबाबतची माहिती उपलब्ध करेल.
नॉट ऑन मार्ट याद्वारे, ग्राहक शेतकरी किंवा कारागीर यांच्याशी बोलून थेट व्यवहार करू शकतील. यामध्ये शेतकरी किंवा कारागीर यांचे संपर्क तपशील ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याद्वारे, त्यांना त्यांच्या उत्पादनाची १०० टक्के किंमत मिळेल. पॅकेजिंग, वितरण किंवा इतर बाबींच्या बाबतीत, नॉट ऑन मार्टची टीम मदत करेल.
आणखी बातम्या...
- "माझी ताकद काय आहे, ते १०५ आमदार असूनही विरोधी पक्षात बसलेल्यांना विचारा!"
- दाऊदचा हस्तक बोलतोय, उद्धव ठाकरेंशी बोलायचंय; 'मातोश्री'वर दुबईहून फोन
- दिपेश सावंतच्या अटकेप्रकरणी 'एनसीबी' अडचणीत, कोर्टाने मागितले उत्तर
- सहा सरकारी बँकाच्या खासगीकरणावर भाजपाचा डोळा, राष्ट्रवादीच्या नेत्याचा आरोप
- राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन करा अन् शरद पवारांना अध्यक्ष बनवा; रामदास आठवलेंची सूचना
- 'ना भूले हैं, ना भूलने देंगे'; सुशांतच्या मृत्यूवरून राजकारण, भाजपाने छापले स्टिकर्स
- "२०२४ आणि २०२९ मध्येही भाजपा जिंकणार", सुब्रमण्यम स्वामींचा मोदी सरकारला सल्ला
- मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा; कंगनाचे खुले आव्हान